‘….प्रवास अखेर संपला’, प्रसाद ओक यांच्या लक्षवेधी पोस्टने वेधल्या सर्वांच्या नजरा

Prasad Oak : प्रसाद ओक यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत मानले अनेकांचे आभार... सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त प्रसाद ओक यांच्या पोस्टची चर्चा... प्रसाद ओक यांच्या पोस्टवर चाहत्यांनी केला लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव

'....प्रवास अखेर संपला',  प्रसाद ओक यांच्या लक्षवेधी पोस्टने वेधल्या सर्वांच्या नजरा
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 9:01 PM

Prasad Oak : अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक कायम नवनवीन प्रयोग करताना दिसतात. चाहते देखील प्रसाद ओक यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. आता देखील प्रसाद ओक यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रसाद ओक आता “महापरिनिर्वाण” सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे. चाहते देखील “महापरिनिर्वाण” सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. आता प्रसाद ओक यांनी “महापरिनिर्वाण” सिनेमाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. सध्या सर्वत्र प्रसाद ओक यांच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर प्रसाद ओक यांनी शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत प्रसाद ओक यांनी सिनेमाची शुटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. ‘“महापरिनिर्वाण” आज अखेरीस ४० दिवसांचा अत्यंत अवघड, खडतर असा पण प्रचंड समाधान देणारा शूटिंग चा प्रवास संपला..!! माझ्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार..!! माझे सहकलाकार अंजली पाटील, गौरव मोरे, कुणाल मेश्राम, कमलेश सावंत, हेमल इंगळे… तुमचं सेट वरचं सोबत असणं खूप मोलाचं आणि भार हलका करणारं होतं…!!!’

‘फुलवा… तुझ्यासोबत पहिल्यांदाच काम केलं मी पण खूप मज्जा आली…!!! नितीश नांदगावकर… फार सुंदर सेट्स आणि चंद्रकांत सोनावणे सर… एखादी बाई दागिना कसा मिरवते तसे तुमचे कपडे घालून मिरवावसं वाटलं…!!! वा…!!! वा…!!! माझी मेक अप टीम सलीम, प्रताप, आणि सुन्या तुम्हाला खूप प्रेम…!!!’

पुढे प्रसाद ओक म्हणाले, ‘दिग्दर्शक शैलेंद्र बागडे सर, छायाचित्रकार अमर कांबळे आणि निर्माते आशिष सर आणि सुनील सर… तुमच्या कष्टांचं कौतुक करायला शब्दच नाहीयेत माझ्याकडे… इतकं perfect काम करणारे निर्माते, छायाचित्रकार आणि लेखक दिग्दर्शक एकत्रपणे फार कमी वेळ अनुभवायला मिळतात…!!! हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय झाला त्याचं श्रेय संपूर्ण टीम ला…!!!’ सध्या सर्वत्र प्रसाद ओक यांच्या सिनेमाची चर्चा रंगली आहे.

“महापरिनिर्वाण” सिनेमा

“महापरिनिर्वाण” दिन म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन… 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला होता. तेव्हा घडलेला प्रसंग “महापरिनिर्वाण” सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.