प्रसाद ओकला मिळतं सर्वाधिक मानधन? अभिनेत्याने दिलं उत्तर

| Updated on: Jul 23, 2024 | 1:23 PM

गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर 2' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. 'धर्मवीर'च्या पहिल्या भागाच्या यशानंतर प्रसाद ओक हा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक फी घेणारा अभिनेता ठरला का, याचं उत्तर त्याने दिलं आहे.

प्रसाद ओकला मिळतं सर्वाधिक मानधन? अभिनेत्याने दिलं उत्तर
Prasak Oak
Image Credit source: Instagram
Follow us on

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर त्याच्या सीक्वेलची घोषणा झाली. प्रवीण तरडे दिग्दर्शित या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. यात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. आता ‘धर्मवीर 2’बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला सोशल मीडियावर दमदार प्रतिसाद मिळतोय. ‘धर्मवीर’नंतर प्रसाद हा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरल्याचं म्हटलं जात होतं. त्यावर आता प्रसादने नुकत्या दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

‘आरपार ऑनलाइन’ या पॉडकास्ट मुलाखतीत प्रसाद म्हणाला, “हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा हाययेस्ट व्ह्यूड (Highest Viewed) अभिनेता असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी हाययेस्ट पेड अभिनेता आहे का हे दोन व्यक्तींना विचारावं. एक म्हणजे माझी पत्नी मंजिरी आणि दुसरे म्हणजे निर्माते मंगेश देसाई. ही दोन लोकं याबद्दल सांगू शकतील. पण मला असं वाटतं की हल्ली हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा आपण हाययेस्ट रिड ( Read ) कलाकार आहोत का? आपल्याबद्दल लोक किती वाचतात किंवा हाययेस्ट वेड लावणारा अभिनेता आहे का, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं”

हे सुद्धा वाचा

अनेक दमदार भूमिका असो किंवा त्याचं अगदी चोखपणे केलेलं दिग्दर्शन असो, अगदी हास्यजत्रेमधली त्याची मार्मिक टिपण्णी असो.. प्रसाद हा बहुआयामी कलाकार आहे. ‘धर्मवीर 2’ या चित्रपटानंतर प्रसाद येणाऱ्या काळात अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाला बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी ठरला होता. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता या ‘धर्मवीर‘चा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.