‘हत्येला आत्महत्या म्हणून घोषित करतात…’, तुनिशा शर्मा आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठा खुलासा
'तुनिशा शर्मा आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरण एक सारखंच...', नक्की काय आहे सत्य?
Tunisha Sharma Death Case: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने बॉयफ्रेंड शिझान खानच्या मेकअप रुममध्ये गळफास घेत जीवन प्रवास संपवला, तर २०२० मध्ये प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (sushant singh rajput) वांद्रे येथील राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली. पण आता तुनिशा आणि सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे… असं वक्तव्य दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बनर्जी (Pratyusha Banerjee) चे वडील शंकर बनर्जी यांनी केलं आहे. तुनिशाचं प्रकरण दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणे असल्याचं देखील शंकर बनर्जी म्हणाले.
‘अली बाबा- दास्तान ए काबुल’ मालिकेतील अभिनेत्री तुनिशा शर्माची आत्महत्या हत्या असल्याचा दावा ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बनर्जीच्या वडिलांनी केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं ‘हत्येला आत्महत्या म्हणून घोषित करतात.. जसं सुशांतसोबत झालं.
शंकर बनर्जी पुढे म्हणाले, ‘जेव्हा मी तुनिशाच्या आत्महत्येबद्दल वाचलं, तेव्हा जुन्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. तुनिशाच्या आईंचं दुःख मी सहज समजू शकतो. मी समजू शकतो २० वर्षांच्या मुलीला गमावण्याचं दुःख काय असेल…’
तुनिशा प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु तुनिशा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बॉयफ्रेंड शिझान खान याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिझानची कसून चौकशी करत आहेत. अद्याप तुनिशाने आत्महत्या का केली? यामागचं कारण पोलिसांना कळू शकलेलं नाही.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर आता शीजान खान याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. कारण शीजानसोबतच त्याच्या कुटुंबियांची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे.