प्रिती झिंटाची भारतातच नाही तर परदेशातही गडगंज संपत्ती, 50 व्या वर्षी अभिनेत्री इतक्या कोटींची मालकीण
Preity Zinta net worth: सिनेविश्वात सक्रिय नसून कोट्यवधींची माया कमावते प्रिती झिंटा..., भारतातच नाही तर परदेशातही गडगंज संपत्ती, अभिनेत्री इतक्या कोटींची मालकीण... प्रिती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ म्हणजे अभिनेत्री प्रिती झिंटा आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रिती आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर, प्रितीने ‘दिल’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर वीर जारा, कोई मिल गया, क्या कहना, सोल्जर, दिल चाहता है, दिल है तुम्हारा, लक्ष्य, कभी अलविदा ना कहना, मिशन कश्मीर यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रितीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी रॉयल आयुष्य जगते.
प्रिती झिंटाची नेटवर्थ
लाईफस्टाईल एशियानुसार, 2024 पर्यंत प्रिती झिंटा हिची संपत्ती जवळपास 183 कोटी आहे… असं सांगण्यात येत आहे. अभिनेत्री ब्रँड एंडोर्समेंटसाठी 1.5 कोटी रुपये घेते आणि तिचं वार्षिक उत्पन्न 12 कोटी रुपये आहे. याशिवाय अभिनेत्रीचं मुंबई आणि शिमल्यात एक आलिशान घर देखील आहे. 2023 मध्ये, प्रीतीने मुंबईतील पाली हिलमध्ये 17 कोटी रुपयांची नवीन मालमत्ता खरेदी केली होती.
प्रिती झिंटा हिच्याकडे अनेक आलिशान गाड्या देखील आहे. ज्यामध्ये लेक्सस एलएक्स 470 क्रॉसओवर आहे. या कारची किंमत 12 लाख रुपये आहे. अभिनेत्रीकडे पोर्श, मर्सिडीज बेन्ज ई क्लास आणि एक बीएमडब्ल्यू देखील आहे.




पंजाब किंग्सची मालकीण प्रिती झिंटा
रिपोर्टनुसार, प्रीती झिंटा ही पंजाब किंग्जची मालकीण आहे. 2008 मध्ये अभिनेत्रीने नेस वाडिया, मोहित बर्मन आणि इतरांसोबत ही टीम 6.22 दशलक्ष कोटी रुपयांना विकत घेतली होती. 2022 मध्ये संघाचे मूल्य 925 दशलक्ष डॉलर्स झाले. अभिनेत्रीने टीममध्ये 350 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
प्रिती झिंटाचं खासगी आयुष्य
प्रिती झिंटाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2016 मध्ये जीन गुडइनफशी लग्न केले. जीन आणि प्रीती यांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केले आणि त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेत्रीने सरोगेसीच्या मदतीने जुळ्या मुलांना जन्म दिला.