Preity Zinta ने घेतलं कामाख्या देवी देवीचं दर्शन; अभिनेत्रीला आला असा अनुभव…

बॉलिवूडपासून दूर असलेली प्रिती झिंटा गुवाहाटीत पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनासाठी; अभिनेत्रीने आलेला अनुभव सांगत चाहत्यांना देखील दर्शनासाठी जाण्याचं केलं आवाहन

Preity Zinta ने घेतलं  कामाख्या देवी देवीचं दर्शन; अभिनेत्रीला आला असा अनुभव...
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 12:15 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर प्रितीचे असंख्य चाहते देखील आहेत. प्रिती कायम तिच्या खासगी आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रिती नुकताच गुवाहटी याठिकाणी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचली. मंदिरातील व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओचीच चर्चा सुरु आहे.

शनिवारी अभिनेत्रीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने मंदिराच्या भोवतालचा परिसर देखील दाखवला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. पारंपरिक ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. प्रितीच्या व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. एवढंच नाही तर, अभिनेत्री देवीचं दर्शन घेतल्यानंतर आलेल्या अनुभवाबद्दल देखील सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

व्हिडीओ पोस्ट करत प्रिती कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘गुवाहाटीला जाण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराला भेट द्यायची होती. माझ्या फ्लाईटला उशीर झाला होता. म्हणून मी पूर्ण रात्र जागी होती. पण मंदिरात आल्यामुळे मला प्रचंड सकारात्मक वाटत आहे.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘या मंदिरात आल्यानंतर माझ्या मनाला शांतता आणि सकरात्मक विचार करायची शक्ति मिळाली. तुम्ही गुवाहटी याठिकाणी आल्यानंतर कामाख्या देवीचं दर्शन नक्की घ्या…जय माँ कामाख्या – जय माता दी.’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रिती झिंटाने गुडइनफ याच्यासोबत केलं लग्न

प्रिती झिंटा झगमगत्या विश्वाला रामराम ठोकत पतीसोबत परदेशात राहत आहे. अभिनेत्रीने २९ फेब्रुवारी २०१६ मध्ये अमेरिकेत लग्न केलं. दोघांनी २०२१ मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. अभिनेत्रीने सरोगेसीच्या माध्यामातून मुलांचं जगात स्वागत केलं. मुलांच्या जन्माची बातमी अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली.

प्रिती आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अभिनेत्रीच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती. पण गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री रुपेरी पडद्यावर झळकलेली नाही. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्रितीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.