Rhea Chakraborty | प्रिन्स नरूलाने रिया चक्रवर्तीला दिली धमकी; ‘रोडीज’चं शूटिंग मध्येच थांबवलं

2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया सर्वाधिक चर्चेत आली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणातील ड्रग्जच्या अँगलचा तपास होत असताना त्यात रिया आणि तिचा भाऊ शौविकचं नाव समोर आलं होतं. या दोघांना अटकही झाली होती.

Rhea Chakraborty | प्रिन्स नरूलाने रिया चक्रवर्तीला दिली धमकी; 'रोडीज'चं शूटिंग मध्येच थांबवलं
Prince Narula, Rhea Chakraborty, Gautam GulatiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 12:24 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या तीन वर्षांनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने टेलिव्हिजनवर कमबॅक केलं आहे. रोडिज या लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये ती गँग लीडर म्हणून सहभागी झाली आहे. रोडिजचा 19 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्यासाठी ऑडिशन्ससुद्धा सुरू झाले आहेत. यामध्ये रियासोबतच प्रिन्स नरुला, गौतम गुलाटी आणि सोनू सूद हे सेलिब्रिटीसुद्धा आहेत. हा शो सुरू होताच रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत आली आहे. कारण रोडिजच्या शूटिंगदरम्यान प्रिन्स नरुला आणि रिया चक्रवर्ती यांच्यात मोठा वाद झाला आहे. त्यामुळे या शोची शूटिंग थांबवण्यात आली आहे.

गौतम गुलाटी, रिया चक्रवर्ती आणि प्रिन्स नरुला या तिघांमध्ये काहीच आलबेल नसल्याचं कळतंय. छोट्या छोट्या कारणामुळे प्रिन्सचं गौतम आणि रियाशी सतत भांडण होत आहे. मात्र गौतम आणि रिया त्याला नीट समजावून घेताना दिसत आहेत. पण एका भांडणादरम्यान प्रिन्स नरुलाने रियाचा अपमान केला आणि तिला धमकीसुद्धा दिली आहे. यानंतर रियाने रोडिजच्या क्रूसोबत बातचित केल्यानंतर शूटिंग थांबवली आहे.

हे सुद्धा वाचा

प्रिन्स आणि रियामध्ये हा वाद नेमका कशामुळे झाला हे एपिसोड प्रसारित झाल्यावरच स्पष्ट होऊ शकेल. मात्र वादाच्या काही वेळानंतर त्याने रियाशी माफी मागितल्याचंही समजतंय. मात्र गौतम आणि रियाने प्रिन्ससोबत शूटिंग करण्यास साफ नकार दिला आहे. रोडिज हा शो येत्या 3 जून पासून शनिवार-रविवार संध्याकाळी 7 वाजता एमटीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by MTV Roadies (@mtvroadies)

रिया चक्रवर्तीचा रोडिजचा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. या व्हिडीओमध्ये रिया म्हणते, “तुम्हाला काय वाटलं, मी परत येणार नाही? मी घाबरून जाईन? घाबरण्याची वेळ आता दुसऱ्यांची आहे. भेटुयात ऑडिशन्सला.” या व्हिडीओवर सुशांतच्या बहिणीने तीव्र संताप व्यक्त केला होता. सुशांतची बहीण प्रियांकाने नाव न घेता ट्विट केलं होतं. ‘तू का घाबरशील? तू तर वेश्या होती, आहे आणि राहशील. प्रश्न हा आहे की तुझा उपभोगता कोण आहे? कोणी सत्ताधारीच ही हिंमत करू शकतो’, असं तिने लिहिलं होतं.

2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया सर्वाधिक चर्चेत आली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणातील ड्रग्जच्या अँगलचा तपास होत असताना त्यात रिया आणि तिचा भाऊ शौविकचं नाव समोर आलं होतं. या दोघांना अटकही झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर रिया बरेच दिवस माध्यमांपासून आणि सोशल मीडियापासून दूर होती. काही दिवसांपूर्वी रिया तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा प्रकाशझोतात आली होती. ती बंटी सजदेहला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.