बाळाच्या जन्मानंतर टीव्ही इंडस्ट्रीतील जोडप्यामध्ये घटस्फोट? बायकोने खोटे आरोप केल्याची स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर

बॉलिवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सतत ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. अशाच एका जोडप्याच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. बायकोने खोटे आरोप केल्याचे म्हणत स्टोरी थेट इंस्टाग्रामवरच शेअर केली आहे.

बाळाच्या जन्मानंतर टीव्ही इंडस्ट्रीतील जोडप्यामध्ये घटस्फोट? बायकोने खोटे आरोप केल्याची स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 2:24 PM

बॉलिवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सतत ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. तसेच हे सेलिब्रिटी आपल्या नात्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल मोकळेपणाने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत गोष्ट शेअक करतात. आताही अशाच एका जोडप्याच्या घटस्फोटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसतेय.

सध्या टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपे प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दाम्पत्याच्या वैयक्तिक आयुष्यात अलबेल नसल्याची चर्चा सध्या सुरु आहे. जेव्हा त्यांचा घरगुती वाद सोशल मीडियावर आला तेव्हा लोकांनी अनेक अंदाज लावायला सुरुवात केली.

बाळाच्या जन्मानंर वाद

प्रिन्स नरुलाची पत्नी युविका चौधरीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका मुलीला जन्म दिला. मात्र याचवेळी त्याच्यात काहीतरी बिनसल्याचा चाहत्यांना अंदाजा आला. आधी प्रिन्सला डिलिव्हरीदरम्यान पत्नी युविकासोबत नसल्यामुळे टार्गेट करण्यात आलं होतं मात्र त्यावर प्रिन्सने खुलासा करत सांगितले की त्याला युविकाने तिच्या डिलिव्हरीबद्दल काहीही सांगितले नव्हते. प्रिन्सच्या ब्लॉगनंतर युविकाने नुकताच एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने प्रिन्स आणि त्याच्या कुटुंबियांसोबत डिलिव्हरीबाबत अनेक गोष्टी केल्याचं दिसत आहे.

तसेच त्या व्हिडीओमध्ये ती डिलीव्हरीसाठी हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाली आहे. तेव्हा ती म्हणते की, “माझी अशी अवस्था पाहून मी प्रिन्सलाही फोन करून बोलावून घेतलं आहे”. पण युविकाने तिच्या व्लॉगमध्ये जे सांगितले ते सर्व खोट असल्याचा दावा केला आहे. युविकाचा व्लॉग पाहिल्यानंतर प्रिन्स नाराज झाला आणि त्याने तिचे नाव न घेता इंस्टा स्टोरीवर शेअर केली. प्रिन्सने तिचे नाव न घेता, कमेंट केली आहे की, “काही लोक निर्दोष दिसण्यासाठी त्यांच्या व्लॉगमध्ये खोटे सांगतात, तर जे गप्प राहतात त्यांना चुकीचे मानले जाते” प्रिन्सची ही पोस्ट केवळ युविकासाठीच होती असे चाहत्यांना वाटते. त्याने नाव न घेता युविकावर खोटे बोलल्याचा आरोप केला आहे.

बायकोवर खोट बोलत असल्याचा आरोप 

आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये प्रिन्सने लिहिले- ‘काही लोक व्लॉग्समध्ये खोटे बोलून खरे बनतात. आणि काही लोक गप्प राहिल्यामुळे चुकीचे ठरतात. या युगात नात्यांपेक्षा व्लॉग्स अधिक महत्त्वाचे आहेत.’ यासोबतच प्रिन्सने जया किशोरीचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये चूक कोणाचीही असो, मानसिक शांतीसाठी गप्प राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यावर कमेंट करताना प्रिन्स म्हणाला, ‘हे अगदी खरं आहे.’

दरम्यान या जोडप्यामध्ये वाद असल्याचे जास्त प्रकर्षाने समोर आलं ते मुलीच्या जन्मानंतर युविका आईकडे राहायला गेली तेव्हा. तसेच यावेळी प्रिन्सने देखील एक व्लॉग शेअर करत, ज्यामध्ये त्याने सांगितले की युविकाने त्याला डिलिव्हरीच्या तारखेबद्दल सांगितले नव्हते, त्याला याची माहिती दुसऱ्यांकडून मिळाली. तो म्हणाला- ‘याआधी मला मुल कधी होणार आहे, हे मला माहीतही नव्हते, मी पुण्यात शूटिंग करत होतो. अचानक मला कोणाकडून तरी कळलं की आज डिलिव्हरी आहे. माझ्यासाठी एक सरप्राईज होतं. कसले सरप्राईज आहे हे मला माहीत नव्हतं. थोडं विचित्र वाटत होतं, म्हणून मी लगेचच आलो. इथे आल्यावर मी माझ्या आई-वडिलांना फोन केला, तर त्यांनाही राग आला.’

युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांचे 2018 साली लग्न झाले होते. लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे जोडपे आई-वडील झाले, मात्र युविकाने बाळ झाल्यानंतर थेट आईच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. तिला 45 दिवस आईच्या घरी रहायचे होते.

 

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.