Priya Ahuja | प्रिया आहुजा हिने केली असित कुमार मोदी यांची पोलखोल, प्रेग्नेंसीनंतर काय घडले याचा केला धक्कादायक खुलासा

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर अनेक गंभीर आरोप हे करण्यात आले असून यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय.

Priya Ahuja | प्रिया आहुजा हिने केली असित कुमार मोदी यांची पोलखोल, प्रेग्नेंसीनंतर काय घडले याचा केला धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 2:35 PM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन (Entertainment) करत आहे. विशेष म्हणजे आजही या मालिकेवर अगोदर प्रमाणेच प्रेम केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका प्रचंड चर्चेत आलीये. मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) हे मोठ्या वादात सापडले आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील काही कलाकारांनी असित कुमार मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे केले आहेत. असित कुमार मोदी यांच्यावर होत असलेले आरोप (Accusation) पाहून चाहत्यांना देखील अत्यंत मोठा धक्का बसलाय. सतत असित कुमार मोदी यांच्यावर आरोप केले जात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार हे तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी असित कुमार मोदी यांच्यावर आरोप करत म्हटले की, मला माझ्या कामाचे पैसे दिले जात नाहीयेत. यांचा वादा थेट कोर्टात देखील पोहचलाय.

शैलेश लोढा आणि असित कुमार मोदी यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच जेनिफर हिने देखील असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. जेनिफर हिने थेट असित कुमार मोदी यांच्यावर लैगिक अत्याचाराचा देखील आरोप केला. जेनिफर हिच्यानंतर लगेचच मालिकेत बावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने देखील काही आरोप केले.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहूजा हिने देखील मोठे खुलासे केले आहेत. प्रिया आहूजा आणि मालव यांचे लग्न झाल्यानंतर असित मोदी यांच्या वागण्यात बरेच बदल झाल्याचे देखील प्रिया हिने सांगितले. प्रिया हिने तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या एक्स डायरेक्टर मालव राजदा याच्यासोबत लग्न केले. काही दिवसांपूर्वीच मालव यांनीही मालिका सोडलीये.

प्रिया म्हणाली की, लग्न झाल्यानंतर ज्यावेळी बाळ झाले, त्यानंतर काही दिवसांनी मला मालिकेमध्ये पुनरागमन करायचे होते. मी एकेदिवशी असित कुमार मोदी यांना मेसेज केला की, मला तुम्हाला बोलायचे आहे. त्यानंतर त्यांनी मला फोन केला. मग मी त्यांना म्हणाले की, मला रिटाच्या भूमिकेबद्दल तुमच्यासोबत बोलायचे आहे.

त्यावेळी असित मोदी मला थेट म्हटले की, आपण यावर नंतर बोलू मी आता कामात आहे. मात्र, त्यानंतर मला त्यांनी काॅल केला नाही. मला खूप जास्त वाईट वाटले. मी रडायला लागले. कारण ते माझ्यासोबत अशाप्रकारे वागतील याची मी कधीच कल्पना देखील नव्हती केली. मी आणि मालव जास्त वेळ सेटवर टाईमपास करतो असे देखील अनेकदा त्यांना वाटायचे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.