City of Dreams मिळवण्यासाठी प्रिया बापटने केलाय मोठा त्याग! खुद्द अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

इंडस्ट्रीमध्ये राहून प्रिया बापट हिने केलाय अनेक संकटांचा सामना; ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मिळवण्यासाठी अभिनेत्रीला कारावा लागलाय मोठा त्याग...

City of Dreams मिळवण्यासाठी प्रिया बापटने केलाय मोठा त्याग! खुद्द अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 11:08 AM

मुंबई | ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ फेम अभिनेत्री प्रिया बापट हिने स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण केलं आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये झळकलेली प्रिया सध्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ सीरिजमध्ये राजकारणी महिलेच्या भूमिकेतून चाहत्यांच्या मनात राज्य करत आहे. ‘सीटी ऑफ ड्रीम्स’ नंतर प्रिया बापट लवकरच ‘रफूचक्कर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रियाने इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या घराणेशाहीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र प्रिया बापट आणि तिने घराणेशाहीवर केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

घराणेशाहीबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘घराणेशाहीकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा आहे. मला असं वाटतं की ज्या कुटुंबाची मुले इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छितात किंवा जे लोक त्यांना ब्रेक देण्यास तयार आहेत त्यांना प्रश्न विचारणे योग्य नाही. साहजिकच माझा संघर्ष, प्रवास आणि त्यांचा प्रवासात फरक दिसतो. माझ्यापेक्षा त्यांना खूप वेगाने संधी मिळतात हे तथ्य आहे. पण, मला वाटते की जो प्रतिभावान असेल तोच इंटस्ट्रीमध्ये टिकून राहिल…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी गेल्या २० वर्षांपासून माझ्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. ‘सीटी ऑफ ड्रीम्स’ मिळण्यासाठी मला प्रचंड काळ लागला. गेल्या वर्षीपासून मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. इंडस्ट्रीमध्ये बाहेरून आलेल्या कालाकारांना स्थायिक होण्यासाठी आणि ते कोण आहेत आणि त्यांच्या प्रतिभेवर विश्वास ठेवण्यास लोकांना वेळ लागतो…’

‘हा माझा प्रवास आणि आणि त्यांचा प्रवास वेगळा असू शकतो… हे दोन भिन्न प्रवास आहेत…’ असं देखील अभिनेत्री प्रिया बापट म्हणाली. पौर्णिमा गायकवाड म्हणून अभिनेत्री प्रिया बापट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ नंतर प्रिया बापट हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे..

‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या दोन सीझनला ज्याप्रमाणे चाहत्यांनी प्रतिसात दिला, त्याचप्रमाणे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीरिजला देखील प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये प्रिया बापटने साकारलेल्या भूमिकेच सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

सोशल मीडियावर देखील प्रिया बापट कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.