AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | कोरोनावर मात केल्यानंतर प्रिया बापट म्हणतेय, ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे…’, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये प्रिया हातात कप घेऊन ‘ऐरणीच्या देवा...’ हे गाणं गुणगुणताना दिसत आहे. सध्या कोरोना काळात हे गाणं तिला सुचल्याने तिने हा व्हिडीओ तयार केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये ‘गो कोरोना गो’, असे प्रियाने लिहीले आहे.

Video | कोरोनावर मात केल्यानंतर प्रिया बापट म्हणतेय, ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे...’, पाहा व्हिडीओ
प्रिया बापट
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 8:01 AM

मुंबई : काही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वातील क्यूट जोडी अर्थात अभिनेता उमेश कामत (Umesh kamat) आणि अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) यांना कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती चाहत्यांना दिली होती. दोघांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर दोघं घरातच क्वारंटाईन झाले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. या दरम्यान ते त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात होते. नुकतीच त्यांनी चाहत्यांना कोरोनामुक्त झाल्याची गुडन्यूज देखील दिली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रिया बापटचा सकारात्मकता दाखवणारा व्हिडीओ चर्चेत आला आहे (Priya Bapat singing Airanichya Deva song share video on social media).

या व्हिडीओमध्ये प्रिया हातात कप घेऊन ‘ऐरणीच्या देवा…’ हे गाणं गुणगुणताना दिसत आहे. सध्या कोरोना काळात हे गाणं तिला सुचल्याने तिने हा व्हिडीओ तयार केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये ‘गो कोरोना गो’, असे प्रियाने लिहीले आहे.

पाहा प्रियाचा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

नुकताच उमेश- प्रियाचा क्वारंटाईन कालावधी संपला असून, ते कोरोनातून बरे झाले आहेत. यानंतर दोघांनी इन्स्टाग्रामवर लाईव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी चाहत्यांची संवाद साधताना त्यांनी ही गुडन्यूज शेअर करत, प्रर्थानांसाठी आणि शुभेच्छांसाठी सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत (Priya Bapat singing Airanichya Deva song share video on social media).

लवकरच कामावर परतणार!

या लाईव्ह सेशन दरम्यान चाहत्यांनी दोघांनाही विविध प्रश्न विचारले होते. एका चाहत्याने त्यांना ‘आणि काय हवं ?’ या वेबसीरीजचे तिसरे पर्व नेमके कधी येणार याविषयी विचारले होते. तेव्हा लवकरच या सीरीजचे उरलेले चित्रीकरण पूर्ण करणार असल्याचे उमेशने आणि प्रियाने सांगितले, असून लवकरच ही सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्याने म्हटले आहे. प्रिया-उमेशने यावेळी या विषाणूपासून बचाव करण्यासाठी त्यांनी कोणती काळजी घेतली, इतरांनीही कोणती काळजी घ्यायला हवी, याची देखील माहिती दोघांनी दिली. कोरोनातून बरे झाल्यानंतर लवकरच योग्य ती काळजी घेऊन दोघेही कामाला सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

‘…आणि काय हवं’च्या चित्रीकरणाला सुरुवात

प्रिया आणि उमेशने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय वेब सीरीजच्या दुसर्‍या सीझनसाठी एकत्र शूटिंग सुरू केली होती. याशिवाय ते ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या मराठी नाटकासाठी टूर करण्यात व्यस्त होते. या जोडप्याने 2011 मध्ये लग्न गाठ बांधली होती आणि त्यांनी ‘टाईम प्लीज’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘आणि काय हवं?…’ या वेब सीरीजच्या माध्यमातून उमेशने पहिल्यांदाच वेब विश्वात पदार्पण केले होते. तर, प्रिया बापटची ही दुसरी सीरीज होती. ‘आणि काय हवं?…’चे तिसरे पर्व लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

(Priya Bapat singing Airanichya Deva song share video on social media)

हेही वाचा :

पाचवीपर्यंतचं शिक्षण, केवळ 12 रागांचं माहिती; तरीही दर्जेदार गीते लिहिली, वाचा शिरवाळेंचे किस्से!

आईबरोबर अवॉर्ड शो बघायचो, तेव्हा… ‘देवमाणूस’ किरण गायकवाडला स्ट्रगलिंगच्या आठवणी

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.