Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्या धर्मात लग्न केल्याने ‘द फॅमिली मॅन’ फेम प्रियामणीवर टीकेचा वर्षाव; अभिनेत्रीने सोडलं मौन

'द फॅमिली मॅन' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रियामणी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याने प्रियामणीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

दुसऱ्या धर्मात लग्न केल्याने 'द फॅमिली मॅन' फेम प्रियामणीवर टीकेचा वर्षाव; अभिनेत्रीने सोडलं मौन
Priyamani Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 10:43 AM

अभिनेता अजय देवगणच्या ‘मैदान’ या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियामणी तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. प्रियामणीने मुस्तफा राजशी लग्न केलंय. ट्रोलिंगचा परिणाम तुझ्या खासगी आयुष्यावर झाला का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. “खरं सांगायचं झालं तर माझ्यावर किंवा माझ्या आईवडिलांवर त्याचा अजिबात परिणाम झाली नाही. माझा पती माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला”, असं तिने सांगितलं.

“माझ्या पतीने मला आश्वासन दिलं होतं की, काहीही घडलं तरी ते सर्वांत आधी माझ्याकडे यावं याची काळजी मी घेईन. पण मी फक्त इतकंच सांगेन की प्रत्येक पावलावर तू माझा हात पकड आणि माझी साथ दे. आम्ही दोघं ज्यावेळी एकमेकांना डेट करत होतो, तेव्हासुद्धा मला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मी त्याला तीच गोष्ट सांगितली होती की, माझ्यासोबत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव. आम्ही एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याचं पक्कं ठरवलं होतं. त्यामुळे या वाटेत कोणतंही वादळ आलं तरी आम्ही त्याला एकत्र सामोरं जाणार होतो. मला इतका समजूतदार पार्टनर मिळाल्याने मी खूप खुश आहे. प्रत्येक समस्येवर कशी मात करायची, हे त्याला माहीत असतं”, असं प्रियामणीने सांगितलं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

याविषयी ती पुढे म्हणाली, “ट्रोलिंगबद्दल मला वाईट वाटलं होतं, पण त्यावेळी मी मुंबईत नव्हते. मी बेंगळुरूमध्ये माझ्या पतीसोबत होते. आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली होती आणि त्याचा परिणाम कुटुंबीयांवरही होऊ दिला नव्हता. कोणत्याही टीकेचा फारसा विचार करू नका, कारण अखेर आम्ही दोघं सोबत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे, असं त्यांना समजावलं होतं. त्यांचा आशीर्वाद आणि प्रार्थना आमच्यासोबत कायम आहेत.”

प्रियामणीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली विशेष छाप सोडली आहे. तिने यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ आणि शाहरुख खानच्या ‘जवान’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ती लवकरच ‘द फॅमिली मॅन 3’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.