Bigg Boss 16 : ‘हा’ व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल प्रियंका चौधरी हिच होणार बिग बॉसची विजेती?

बिग बॉसची आवडती स्पर्धक आहे प्रियंका चौधरी? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रियंकाच बिग बॉसची विजेती होणार... असा अंदाज तुम्हीही कराल व्यक्त... एकदा व्हिडीओ नक्की पाहा...

Bigg Boss 16 : 'हा' व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल प्रियंका चौधरी हिच होणार बिग बॉसची विजेती?
Follow us
| Updated on: Feb 12, 2023 | 9:12 AM

Bigg Boss 16 Finale : यंदाच्या सीझनची बिग बॉसची ट्रॉफी कोण घरी घेवून जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) चा फिनाले आज म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. आज बिग बॉस १६ शोचा विजेता कोण होणार? याबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिवाय अभिनेता सलमान खान याला पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक आहे. अशात बिग बॉसच्या घरातील सर्वात दमदार स्पर्धक प्रियंका चौधरी (Priyanka Chaudhary) ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) विजेती होणार अशी दाट शक्यता नोंदवण्यात येत आहे. सध्या सर्वत्र प्रियंकाच्या नावाची चर्चा आहे. सोशल मीडियावर देखील प्रियंकाच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे आज प्रियंकाला बिग बॉसची ट्रॉफी मिळणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) च्या फिनालेपूर्वी कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये बिग बॉस प्रियंकाचं कौतुक करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये शोची स्पर्धक मंचावर उभी असलेली दिसत आहे. याचवेळी बिग बॉस प्रियंकाबद्दल असं काही म्हणतात, ज्यामुळे चाहते मोठ-मोठ्याने ओरडू लागतात.

हे सुद्धा वाचा

प्रियंकाचं कौतुक करत बिग बॉस महणतात, ‘जेव्हा जेव्हा बिग बॉस सीझन 16 चं नाव घेतलं जाईल तेव्हा प्रियंका चहर चौधरी, तुझा आवाज नक्कीच लोकांच्या मनापर्यंत पोहोचेल आणि आज मी मोठ्या अभिमानाने सांगतो, की तुझा आवाज बिग बॉसपर्यंत पोहोचला आहे.’ प्रियंकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉसने केलेलं कौतुक ऐकून प्रियंका म्हणाली, ‘आजचा दिवस कधीही विसरु शकत नाही…’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रियंकाचं बिग बॉस १६ची विजेती होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या सर्वत्र प्रियंकाच्या व्हिडीओची चर्चा आहे. त्यामुळे आजचा फिनाले पाहणं चाहते आणि स्पर्धकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस सीजन 16’ च्या टॉप-5 फायनलिस्टची घोषणा करण्यात आली आहे. शोच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत शिव ठाकरे (shiv thakare), एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भनोट आणि अर्चना गौतम यांनी आपलं स्ठान कायम ठेवलं. त्यामुळे बिग बॉसची आवडती स्पर्धक प्रियंका चाहर चौधरी विजयी होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘बिग बॉस 16’ स्पर्धक प्रियंका चहर चौधरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती घरातील दमदार सदस्यांपैकी एक आहे. ‘बिग बॉस 16’ मध्ये एन्ट्री केल्यानंतर प्रियंका चहर चौधरीच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. सलमान खान याच्या वक्तव्यानंतर प्रियंकाच्या चाहत्यांना तिला मोठ्या पडद्यावर पाहायचं आहे. त्यामुळे शाहरुखच्या ‘डंकी’ सिनेमात प्रियंका हिला संधी मिळाली तर तिच्या आयुष्यातील तो मोठा बदल असणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.