Priyanka Chopra हिच्या कुटुंबातील वाद टोकाला; सोशल मीडियामुळे प्रकरण समोर

Priyanka Chopra | ज्या व्यक्तीसाठी प्रियांका आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती होती, आज त्याच व्यक्तीने 'देसी गर्ल'सोबत असलेलं नातं संपवलं! प्रियांका चोप्रा हिच्या सासरी वादाची ठिणगी... सध्या सर्वत्र प्रियांका आणि तिच्या कुटुंबाची चर्चा...

Priyanka Chopra हिच्या कुटुंबातील वाद टोकाला; सोशल मीडियामुळे प्रकरण समोर
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 8:49 AM

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिच्या सासरी सध्या वाद सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. जोनस कुटुंबातील एका भावाचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. सोफी टर्नर आणि जो जोनस यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या ४ वर्षांनंतर सोफी आणि जो विभक्त होणार आहेत. सोफी आणि जो यांना दोन मुली देखील आहे. सोफी आणि जो यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना, जोनस कुटुंबातील आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. सोफी आणि प्रियांका यांच्यामध्ये देखील वाद असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र जोनस कुटुंबातील वादाची चर्चा रंगली आहे. सोफी टर्नर हिने सोशल मीडियावरून प्रियांका चोप्रा हिला अनफॉलो केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सोफी टर्नर सोशल मीडियावर प्रियांका चोप्रा हिला फॉलो करत नाही. पण सोफी अद्याप जो, केविन आणि त्याची पत्नी डेनिएल जोनस यांना सोशल मीडियावर फॉलो करते. एवढंच नाही तर, प्रियांकाने अद्याप जो आणि सोफी यांच्या घटस्फोटावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

प्रियांका आणि सोफी यांनी एकमेकींना केलं अनफॉलो

मिळालेल्या माहितीनुसार, सोफी आणि जो यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रियांका प्रयत्न करत होती. पण अभिनेत्रीला यश मिळालं नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सोफी आणि प्रियांका यांच्यातील नातं घट्ट आहे. प्रियांका आणि निक यांनी आपल्यासोबत लंडन याठिकाणी यावं अशी सोफी हिची इच्छा होती. पण काहीही झालं तरी मुलांच्या आयुष्यावर कोणताही परिणाम नाही झाला पाहिजे अशी प्रियांका हिचं मत होतं.

प्रियांका चोप्रा आणि सोफी टर्नर यांचं नातं

२०२० मध्ये झालेल्या एका मुलाखतीत सोफी हिने प्रियांका हिचं कौतुक केलं होतं. सोफी म्हणाली, ‘प्रियांका एक उत्तम आणि यशस्वी अभिनेत्री आहे. प्रियांका हिच्यासोबत माझं नातं फार खास आहे. बॉलिवूडमध्ये तिचं २० वर्षांचं करियर आहे. ती भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. निक आणि प्रियांका यांच्या लग्नासाठी आम्ही भारतात गेलो होतो, तेव्हा आम्हाला राजघराण्याप्रमाणे मान देण्यात आला होता..’ असं देखील सोफी म्हणाली होती..

सोफी आणि जो यांचं तुटलं नातं

सोफी आणि जो देखील त्यांच्या नात्यावर अधिकृत वक्तव्य केलं आहे. ‘चार वर्षांनंतर आम्ही आमच्या इच्छेने नातं संपवत आहोत. याबाबत अनेक चर्चा रंगल्या, पण हा आमचा दोघांचा निर्णय आहे. म्हणून तुम्ही आमचा आणि आमच्या मुलांच्या गोपनियतेचा विचार कराल अशी आमची इच्छा आहे…’

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.