Priyanka Chopra Surrogacy पद्धतीनं आई बनली, वाचा काय असते सरोगसी, भारतात यासंबंधीचे नियम काय?

बॉलीवूड स्टार प्रियंका चोप्रानं नुकतीच आई झाल्याची बातमी दिली आहे. सरोगसी पद्धतीनं आई झाल्याचं तिनं सांगितलं आहे. यानिमित्तानं भारतात या पद्धतीने माता बनण्याचे काय नियम आहेत, याविषयी सविस्तर...

Priyanka Chopra Surrogacy पद्धतीनं आई बनली, वाचा काय असते सरोगसी, भारतात यासंबंधीचे नियम काय?
प्रियंका चोप्रा, निक जोन्स
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 11:38 AM

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra)  नुकतीच आई झाल्याची गुड न्यूज दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून तिने ही बातमी दिली. प्रियंका आणि निक जोन्स (Nik Jones) यांचा 2018 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर आता सरोगसी पद्धतीने हे दोघे आई-बाबा झाले आहेत. सरोगसी पद्धतीनं यापूर्वीदेखील अनेकांनी पालकत्वाची संधी मिळवली आहे. यात अनेक सेलिब्रेटिंचाही समावेश आहे. त्यात प्रीति जिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरूख खान, आमिर खान, करण जोहर, एकता कपूर आणि तुषार कपूर यांचाही समावेश आहे. ही प्रक्रिया नेमकी काय असते, त्याचे काही नियम असतात, ते काय आहेत, यावर सविस्तर माहिती घेऊयात.

सरोगसी म्हणजे काय?

गर्भधारणेसाठी एखादे दाम्पत्य दुसऱ्या एका महिलेचा गर्भ भाडे तत्त्वावर घेते, अशा प्रक्रियेला सरोगसी म्हटले जाते. या स्थितीत आई-वडील होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यापैकी पुरुषाचं स्पर्म बाळाला जन्म देणाऱ्या महिलेच्या एग्ससोबत मॅच केलं जातं. याला ट्रॅडिशनल सरोगसी म्हणतात. जोडप्याचे स्पर्म आणि एग्स टेस्ट ट्यूबमध्ये मिसळून बाळाला जन्म देणाऱ्या महिलेच्या गर्भाशयात प्रवेशित करण्यात येतात. ही सुद्धा वेगळ्या प्रकारची सरोगसी आहे. याला जेस्टेशनल सरोगसी म्हणतात. या प्रक्रियेमुळे बाळाला प्रत्यक्ष जन्म देणारी महिला वेगळी असते. या महिलेला सरोगेट मदर असे म्हटले जाते. ज्यांना मूल हवं आहे, अशा दाम्पत्यात आणि सरोगेट मदरमध्ये एक करार केला जातो. त्यानंतर मूल जन्माला आल्यावर त्या बाळाचं पालकत्व दाम्पत्याकडे जातं. मात्र मूल होईपर्यंत संपूर्ण 9 महिने सरोगेट मदरची काळजी घेण्याची जबाबदारीही या दाम्पत्याची असते. तसेच सरोगसी प्रक्रिया करण्यासाठी सरोगेट मदर फिट असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक असतं. तसंच दाम्पत्यालाही मूल जन्माला घालण्यासाठी फिट नाहीत, असं प्रमाणपत्रही द्यावं लागतं.

भारतात सरोगसीचे नियम काय?

सरोगसी प्रक्रिया अस्तित्वात आल्यानंतर भारतासारख्या देशात अनेक महिला पैसा कमावण्याचे साधन म्हणून याकडे पाहू लागल्या. त्यामुळे सरकारनं व्यावसायिक सरोगसीवर लगाम घातले. 2019 मध्ये कमर्शिअल सरोगसीवर निर्बंध घालण्यात आले. त्यानंतर केवळ मदत करण्यासाठी सरोगसी अस्तित्वात आली. कमर्शिअयल सरोगसीवर निर्बंध घालण्यात आले. विदेशी नागरिक, सिंगल पॅरेंट, घटस्फोटित जोडपी, लिव्ह इन पार्टनर्स आणि एलजीबीटी समुदायाशी निगडीत लोकांसाठी सरोगसी नाकारण्यात आली. सरोगसीसाठी सरोगेट मदर पूर्णपणे फिट हवी. तसे प्रमाणपत्र तिच्याकडे हवे. तर सरोगसीचा आधार घेणारे जोडपेही इनफर्टाइल असल्याचं प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, असे कठोर नियम लावण्यात आले होते. मात्र 2020 मध्ये हे नियम शिथिल करण्यात आले. त्यानुसार, कोणत्याही इच्छुक महिलेला सरोगेट मदर बनण्याची परवानगी देण्यात आली होती.

भारतात सरोगसी पालक कोण?

करण जोहर– करण जोहरचे मुलं यश आणि जुही हे आयव्हीएफच्या माध्यमातून झाले आहेत. आमिर खान– आमीर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझाद खान हा सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. शिल्पा शेट्टी– पहिल्या अपत्यानंतर शिल्पा शेट्टीनं दुसरं मूल सरोगसीच्या माध्यमातून प्राप्त केलंय. शाहरूख खान– शाहरूख खान आणि गौरी खान यांचा मुलगा अब्राम खान हा सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. तुषार कपूर– तुषार कपूर याचा मुलगा लक्ष्य हादेखील सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे.

इतर बातम्या-

Beed Crime | बीडमध्ये भाजप नेत्याच्या शिपायाला लुटले, जीवे मारण्याची धमकी; चोरट्यांचा शोध सुरु

कीर्ती शिलेदार याच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचं मोठं नुकसान, अजित पवारांकडून श्रद्धांजली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.