प्रियांका चोप्रा हिच्या नवऱ्याची प्रकृती चिंताजनक, कॉन्सर्ट केले रद्द, व्हिडीओ पोस्ट करत निक म्हणाला…

Priyanka Chopra Husband Nick Jonas | 'या' गंभीर आजाराचा सामना करतोय प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनस... चाहत्यांनी देखील व्यक्त केली चिंता... निक याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट... व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल...

प्रियांका चोप्रा हिच्या नवऱ्याची प्रकृती चिंताजनक, कॉन्सर्ट केले रद्द, व्हिडीओ पोस्ट करत निक म्हणाला...
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 12:41 PM

फक्त बॉलिवूड नाहीतर, हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री पती निक जोनस (Nick Jonas) याच्यामुळे चर्चेत आली आहे. निक जोनस याची प्रकृती ठिक नसल्यामुळे हॉलिवूड गायकाने स्वतःचे अनेक कॉन्सर्ट रद्द केले आहे. शिवाय सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांची माफी देखील मागितली आहे. सध्या सर्वत्र फक्त प्रियांका हिचा पती आणि गायक निक याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

निक जोनास याने नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये गायकाने कॉन्सर्ट पुढे ढकलल्यामुळे त्याच्या चाहत्यांची माफी मागतली आहे. जोनास ब्रदर्सचा कॉन्सर्ट पुढे ढकलण्याचे कारणही निक जोनासने व्हिडिओमध्ये उघड केलं आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ पोस्ट करत निक म्हणाला, ‘माझ्याकडे शेअर करण्यासाठी एक बातमी आहे. ती बातमी शेअर केल्यानंतर तुम्हाला आनंद होणार नाही. पण सांगणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठिक नाही. माझा आवाज देखील खराब झाला आहे. मी कॉन्सर्टसाठी तयारी करत होता. पण जवळपास दोन महिन्यांपासून माझी प्रकृती ठिक नाही…’

‘मी काल दिवसभर अंथरुणावर पडून होतो. ताप, अंगदुखी, घसा खवखवणे आणि खूप वाईट खोकला आहे. निक म्हणाला- डॉक्टरांना दाखवूनही प्रकृतीत सुधार नाही.’ असं निक व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. सध्या गायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पोस्ट करत निक याने कॅप्शनमध्ये, ‘हाय मित्रांनो… मला इन्फ्लूएंजा-ए नावाचा एक भयानक स्ट्रोक झाला आहे. जो सध्या चारही बाजूला फिरत आहे. मी कॉन्सर्टमध्ये गायन करु शकत नाही. म्हणूनच मी मेक्सिको कॉन्सर्टची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा शो ऑगस्टमध्ये होणार आहे.’ असं देखील निक म्हणाला.

निक याची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक चाहते निक याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत गायकासाठी प्रार्थना करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियांका हिचा पती असल्यामुळे निक याच्या चाहत्यांची संख्या भारतात देखील फार मोठी आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.