Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मिस वर्ल्ड 2000’ची स्पर्धा होती ‘फिक्स’? 22 वर्षांनंतर प्रियांका चोप्राच्या विजयावर प्रश्न उपस्थित

प्रियांका चोप्राच्या 'मिस वर्ल्ड'च्या विजयावरून आरोप; व्हिडीओने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

'मिस वर्ल्ड 2000'ची स्पर्धा होती 'फिक्स'? 22 वर्षांनंतर प्रियांका चोप्राच्या विजयावर प्रश्न उपस्थित
Priyanka ChopraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 1:50 PM

मुंबई- बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आता ग्लोबल स्टार बनली आहे. भारतासोबतच तिने परदेशातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाने जेव्हा 2000 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला, तेव्हाच जगभरात ती प्रकाशझोतात आली होती. मिस वर्ल्ड हा सौंदर्यस्पर्धेतील मानाचा किताब आहे. हाच किताब जिंकल्यानंतर प्रियांकासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले होते. मात्र आता तब्बल 22 वर्षांनंतर तिच्या या विजयावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

प्रियांकाच्या मिस वर्ल्ड विजयावर माजी मिस बारबाडोस, लीलानी मॅककॉनीने प्रश्न उपस्थित केला आहे. लीलानी ही प्रियांकासोबत 2000 मध्ये मिस वर्ल्डच्या शर्यतीत होती. आता ती युट्यूबर म्हणून काम करते. तिने तिच्या एका व्हिडीओमध्ये प्रियांकाच्या विजयाला ‘फिक्स’ असं म्हणत गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण स्पर्धेदरम्यान प्रियांकाला विशेष वागणूक दिली जात होती, असाही आरोप तिने केला आहे.

हे सुद्धा वाचा

लीलानीने या वादावर 22 वर्षांनंतर मौन का सोडलं असा प्रश्न विचारला जातोय. यामागचं कारण म्हणजे मिस युएसए या सौंदर्यस्पर्धेतील एका स्पर्धकाच्या विजयावरून सध्या वाद सुरू झाला आहे. याच वादादरम्यान सौंदर्यस्पर्धा या ‘फिक्स’ असतात, असेही आरोप केले जात आहेत. म्हणूनच आता लीलानीने 2000 मधल्या प्रियांकाच्या विजयाचा मुद्दा आता उपस्थित केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

“प्रियांका ही त्यावेळी अशी एकमेव स्पर्धक होती, जिला सारोंग (कमरेवर बांधायचा स्कार्फ) परिधान करण्याची परवानगी मिळाली होती. स्कीन टोन ठीक करण्यासाठी ती कोणती तरी क्रीम लावत होती, मात्र त्याचा काहीच परिणाम होत नव्हता असं आम्हाला सांगितलं गेलं. म्हणूनच तिला स्विमसूट राऊंडमध्ये सारोंग परिधान करण्याची परवानगी मिळाली. त्यावेळी स्पर्धेतील इतर तरुणींनाही प्रियांका अजिबात आवडायची नाही”, असे आरोप लीलानीने केले.

“प्रियांकाला खास वागणूक दिली जात असतानाच आयोजक इतर स्पर्धकांसोबत भेदभाव करायचे. इतर सर्व स्पर्धकांसाठी एका ठिकाणी जेवण मिळायचं, मात्र प्रियांकाला तिच्या बेडवर नाश्ता मिळायचा. इतकंच नव्हे तर ज्या डिझायनरने सर्व स्पर्धकांचे ड्रेस बनवले, त्याने प्रियांकाचा ड्रेस सर्वांत फिटिंग बनवला होता. इतर स्पर्धकांच्या ड्रेसची फिटिंग खराब झाली होती”, असंही ती पुढे म्हणाली. लीलानीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.