Parineeti Chopra च्या लग्नात का नाही आली प्रियांका चोप्रा? मधू चोप्रा यांच्याकडून मोठा खुलासा

Parineeti Chopra | प्रियांका चोप्रा का नाही आली लहान बहिणीच्या लग्नात? मोठं कारण आलं समोर... सध्या सर्वत्र परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा... सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल... परिणीतीला नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देत प्रियांका चोप्रा म्हणाली...

Parineeti Chopra च्या लग्नात का नाही आली प्रियांका चोप्रा? मधू चोप्रा यांच्याकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 12:10 PM

मुंबई : 25 सप्टेंबर 2023 | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि APP पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर २४ सप्टेंबर २०२३ रोजी परिणीती आणि राघव यांनी लग्न केलं. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द परिणीती आणि राघव यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. राघव आणि परिणीती यांच्या लग्नात कुटुंबिय आणि मित्र-परिवार उपस्थित होते, पण लहान बहिणीच्या लग्नात अभिनेत्री प्रियांका चोप्रा नव्हती. म्हणून सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. प्रियांका हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून परिणीती हिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. आता अभिनेत्री प्रियांका लग्नात का आली नाही? याचं कारण मधू चोप्रा यांनी सांगितलं आहे.

प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा यांना स्पॉट केल्यानंतर त्यांना अनेक प्रश्न विचारले. तेव्हा पापाराझींनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. तेव्हा मधू चोप्रा यांनी सर्व प्रश्नांची उत्तर हसतमुखाने उत्तरे दिली. सध्या सर्वत्र मधू चोप्रा यांनी दिलेल्या उत्तरांची चर्चा रंगली आहे.

पापाराझीने मधु चोप्रा यांना विचारलं लग्न कसं झालं आणि प्रियांका चोप्रा का आली नाही? तर आई मधू चोप्रा म्हणाल्या की, लग्न चांगलं झालं आणि प्रियांका हिला कामामुळे येता आलं नाही.. त्यानंतर प्रियांकाने गिफ्ट म्हणून काय दिलं? असा प्रश्न पापाराझींना विचारला.. यावर मधू चोप्रा म्हणाल्या, ‘गिफ्ट वैगरे काहीही नाही…’

एवढंच नाही तर, परिणीती लग्नात कशी दिसत होती, या प्रश्नाचं उत्तर देत मधू चोप्रा म्हणाल्या, ‘परिणीती सुंदर दिसते, पण नवरीच्या रुपात तिचं सौंदर्य फुललं होतं..’ परिणीतीच्या लग्नात प्रियांका चोप्रा आली नाही, पण अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान बहिणीला नव्या प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या…

परिणीतीने सोशल मीडियावर पोस्ट केले लग्नाचे फोटो

परिणीती चोप्राने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही.. आमचा कायमसाठी प्रवास सुरु झाला आहे…’ असं लिहिलं आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

दोघांना एकत्र हॉटेलमध्ये स्पॉट केल्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. पण तेव्हा दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितलं नाही. अखेर साखरपुड्यानंतर परिणीती – राघव यांच्या त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला. दोघांचा साखरपुडा देखील मोठ्या थाटात असून, उदयपूर याठिकाणी परिणीती – राघव विवाहबंधनात अडकले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.