Priyanka Chopra | प्रियांका चोप्राने इतक्या वर्षांनंतर का केली बॉलिवूडची पोलखोल? स्वत:च दिलं उत्तर

प्रियांकाची ही मुलाखत जगभरात व्हायरल झाली. त्यावर बॉलिवूडमधील कलाकारांकडूनही विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. गायक अमाल मलिक, अभिनेते शेखर सुमन, कंगना रणौत यांनी प्रियांकाच्या वक्तव्याला दुजोरा दिला आणि इंडस्ट्रीविषयी आणखी खुलासे केले.

Priyanka Chopra | प्रियांका चोप्राने इतक्या वर्षांनंतर का केली बॉलिवूडची पोलखोल? स्वत:च दिलं उत्तर
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 8:47 AM

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत प्रियांकाने बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत मोठा खुलासा केला. बॉलिवूडमध्ये मला कोपऱ्यात ढकलण्यात आलं होतं, म्हणूनच मी हॉलिवूडकडे वळले, असं ती म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यावर बॉलिवूड इंडस्ट्रीतील बऱ्याच सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत तिला पाठिंबा दिला. मात्र याबाबत ती इतक्या वर्षांनंतर का व्यक्त झाली, असा प्रश्न अनेकांना पडला. प्रियांका लवकरच ‘सिटाडेल’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच सीरिजच्या प्रमोशनदरम्यान तिने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

इतक्या वर्षांनंतर का व्यक्त झाली?

“मी जेव्हा त्या पॉडकास्ट मुलाखतीत होते, तेव्हा मला माझ्या आयुष्याच्या प्रवासाविषयी विचारण्यात आलं होतं. मी 10, 15, 22, 30 आणि 40 वर्षांचे असताना काय काय घडलं याविषयी मोकळेपणे बोलले. माझ्या प्रवासातील सत्याविषयी मी बोलले. माझ्या आयुष्यातील त्या ठराविक काळाबद्दल बोलण्यासाठी आता माझ्यात आत्मविश्वास आहे. आज मी ज्याठिकाणी आहे, त्यामुळे मला भूतकाळात जे वाटलं त्याविषयी बोलण्यासाठी मी स्वतंत्र आहे. माझ्यासोबत जे घडलं होतं, त्यामुळे मी प्रचंड गोंधळलेल्या मनस्थितीत होते. पण खूप आधीच मी त्या सर्व गोष्टींना सोडून पुढे गेले आहे. माझ्या मानसिक शांतीसाठी त्या सर्व गोष्टींना मी माफ केलं आहे. म्हणून त्याविषयी आता मोकळेपणे बोलण्यास सोपं गेलं”, असं प्रियांकाने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“इंडस्ट्रीतील राजकारणाला वैतागले होते”

डॅक्स शेफर्डच्या पॉडकास्टमध्ये प्रियांका बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. “मला इंडस्ट्रीत एका कोपऱ्यात ढकललं गेलं होतं. मला कोणत्याच भूमिका मिळत नव्हत्या. बॉलिवूडमधल्या राजकारणाला मी वैतागले होते आणि थकले होते. त्यातून मला ब्रेक हवा होता. म्हणून मी अमेरिकेला आहे”, असं प्रियांका म्हणाली होती.

बॉलिवूडमधील सेलिब्रिटींकडून पाठिंबा

प्रियांकाची ही मुलाखत जगभरात व्हायरल झाली. त्यावर बॉलिवूडमधील कलाकारांकडूनही विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. गायक अमाल मलिक, अभिनेते शेखर सुमन, कंगना रणौत यांनी प्रियांकाच्या वक्तव्याला दुजोरा दिला आणि इंडस्ट्रीविषयी आणखी खुलासे केले. शेखर सुमन यांनी ट्विट करत बॉलिवूडमधील गटबाजीविरोधात निशाणा साधला होता.

‘मला इंडस्ट्रीतील किमान चार लोक असे माहीत आहेत ज्यांनी माझ्या आणि माझा मुलगा अध्ययन याच्याविरोधात गटबाजी करत आम्हाला अनेक प्रोजेक्ट्समधून बाहेर काढलं. हे मी खात्रीने बोलू शकते. या गुंडांचा दबदबा खूप आहे आणि ते सापापेक्षाही जास्त धोकादायक आहेत. पण खरंतर ते आमच्या वाटेत अडथळे निर्माण करू शकतात पण ते आम्हाला रोखू शकत नाहीत’, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.