Priyanka Chopra | वयाच्या तिशीतच प्रियांका चोप्राने फ्रीज केले होते एग्स; गरोदरपणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

प्रियांका आणि निक यांची भेट 2018 मध्ये झाली आणि त्याच वर्षी दोघांनी लग्न केलं. त्यावेळी प्रियांका 36 आणि निक 26 वर्षांचा होता. निकला भेटण्याच्या खूप आधीच मी एग्स फ्रीज केले होते, असं प्रियांकाने सांगितलं.

Priyanka Chopra | वयाच्या तिशीतच प्रियांका चोप्राने फ्रीज केले होते एग्स; गरोदरपणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 12:15 PM

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रा ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी केवळ देशातच नाही तर परदेशातही लोकप्रियता मिळवली आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये प्रियाकांने बॉलिवूड सोडून हॉलिवूडला जाण्यामागचं धक्कादायक कारण सांगितलं. यासोबतच प्रियांका तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. या पॉडकास्टमध्ये तिने सांगितलं की, आईच्या सांगण्यानुसार प्रियांकाने वयाच्या तिशीतच आपले एग्स फ्रीज केले होते. एग्स फ्रीज करण्याच्या निर्णयाबद्दल तिने खुलेपणाने भाष्य केलं. त्याचप्रमाणे तरुणींना मोलाचा सल्लादेखील दिला. प्रियांका ही एग्स फ्रीज करणारी पहिलीच बॉलिवूड अभिनेत्री नाही. याआधीही बऱ्याच अभिनेत्रींनी हा मार्ग स्वीकारला आहे.

गेल्या वर्षी वयाच्या 39 व्या वर्षी प्रियांका आई झाली. प्रियांका आणि तिचा पती निक जोनासने सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला. त्यांची मुलगी मालती मेरी आता एक वर्षाची झाली आहे. प्रियांकाची आई डॉ. मधू चोप्रा यांनी तिला एग्स फ्रीज करण्याचा सल्ला दिला होता. आईच्या सांगण्यावरून प्रियांकाने वयाच्या तिशीतच हे पाऊल उचललं होतं.

हे सुद्धा वाचा

प्रियांका आणि निक यांची भेट 2018 मध्ये झाली आणि त्याच वर्षी दोघांनी लग्न केलं. त्यावेळी प्रियांका 36 आणि निक 26 वर्षांचा होता. निकला भेटण्याच्या खूप आधीच मी एग्स फ्रीज केले होते, असं प्रियांकाने सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

“मी माझ्या तिशीतच एग्स फ्रीज केले होते आणि माझ्या कामावर मी लक्ष केंद्रीत केलं होतं. मला माझ्या करिअरमध्ये बरंच काही करायचं होतं म्हणून एग्स फ्रीज केल्याने मला एका प्रकारे स्वतंत्रपणाची भावना जाणवली. त्याचप्रमाणे मी तेव्हा अशा व्यक्तीशी भेटले नव्हते, ज्याच्यासोबत मी माझं संपूर्ण आयुष्य घालवू शकेन. त्यामुळे सर्व चिंतांना दूर ठेवून मी आईच्या सल्ल्यानुसार माझे एग्स फ्रीज केले”, असं ती म्हणाली. प्रियांकाची आई स्वत: महिलांची डॉक्टर आहे.

“माझ्या आईने मला तो सल्ला दिला होता आणि मी स्वत:साठी तो निर्णय घेतला. मी माझ्या सर्व तरुण मैत्रिणींना हे सांगू इच्छिते की बायोलॉजिकल क्लॉक खरंच आहे. वयाच्या पस्तीशीनंतर गरोदर होणं खूप कठीण असतं. विशेषकरून अशा महिलांसाठी, ज्या आयुष्याभर सतत काम करत असतात. मात्र आता विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. त्यामुळे तुम्ही हा मार्ग बिनदिक्कतपणे निवडा, असा सल्ला मी तरुणींना देऊ इच्छिते. त्यानंतर तुम्ही कितीही काळापर्यंत काम करू शकता. तुमचे एग्स त्याच वयाचे राहतील, ज्या वयात तुम्ही ते फ्रीज केले होते”, असं ती पुढे म्हणाली.

एग फ्रिजिंग म्हणजे काय?

एग फ्रीजिंग किंवा अंडी गोठवणे ही एक अशी प्रक्रिया आहे जी महिलांची प्रजनन क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी केली जाते. एग फ्रीजिंगमुळे गर्भधारणेचे योग्य वय उलटून गेल्यानंतरही महिलांना गर्भधारणेची सुविधा मिळते. ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत, डॉक्टर महिलेची संपूर्ण तपासणी करतात. एका महिलेच्या शरीरात दर महिन्याला एक अंडे तयार होते. पण प्रत्येक महिन्यात तयार होणारं अंड हे फ्रीज करण्यायोग्य किंवा गोठवण्यास योग्य नसल्यामुळे कोणत्या महिन्याची अंडी जपून ठेवायची हे तपासण्यानंतर कळते.

जर अंड्याचे जतन करण्याचे प्रमाण कमी असेल तर नंतर त्या अंड्यातून गर्भधारणा होण्याची शक्यताही कमी असते. म्हणूनच अंडी काढण्यापूर्वी महिलांवर उपचारही केले जाऊ शकतात. जेव्हा अंडी पूर्णपणे निरोगी असतात आणि गर्भधारणा करण्यास सक्षम असता, तेव्हा डॉक्टर अत्यंत काळजीपूर्वक अंडी काढून टाकतात. ही प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म असून त्यामुळे छोटी शस्त्रक्रिया करता येते. या अंतर्गत, अतिशय पातळ सुईने अंडी काढली जाते आणि ती सबझिरो तापमानात गोठवली अथवा फ्रीज केली जातात.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.