ईशा अंबानींची होळी पार्टी, प्रियांका चाप्रोच्या महागड्या नेकलेसची चर्चा, किंमत जाणून व्हाल हैराण
Priyanka Chopra | ईशा अंबानींच्या होळी पार्टीत सेलिब्रिटींची गर्दी पण प्रियांका चोप्राच्या नेकलेसने वेधलं सर्वांचं लक्ष, किंमत जाणून व्हाल हैराण... होळी पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मुंबई | 16 मार्च 2024 : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. अभिनेत्री भारतात लेक मालती हिच्यासोबत आली आहे. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेली प्रियांका कोणत्या खास कार्यमांसाठी फक्त भारतात येते. नुकताच अभिनेत्री भारतात आली. विमानताळावरचे तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रियांका कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.
मुंबईत येताच प्रियांका तिच्या कमिटमेंट्स पूर्ण करण्यात व्यस्त झाली आहे. नुकताच अभिनेत्रीने बुलगारीची जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून बॅक टू बॅक इव्हेंटमध्ये उपस्थित होताना दिसत आहे. कार्यक्रमांची फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एवढंच नाहीतर, प्रियांका अँटिलियामध्ये ईशा अंबानी यांनी आयोजित केलेल्या रोमन थीमवर आधारित होळी पार्टीलाही हजेरी लावली होती. पार्टीमध्ये प्रियांका हिच्यासोबत अन्य सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. होळी पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
पार्टीमध्ये प्रियांका हिच्यासोबत अन्य सेलिब्रिटी होते. पण सर्वांच्या नजरा प्रियांका हिच्या नेकलेसकडे येऊन थांबल्या. अभिनेत्रीने बुलगारी ब्रँडचा बहु-रंगीत स्टोन नेकलेस घातला होता. अभिनेत्रीच्या नेकपीसची किंमत जाणून तुम्हाला मोठा धक्का बसेल. एका रिपोर्टनुसार प्रियांकाच्या नेकलेसची किंमत एक दोन नाहीतर 8 कोटी रुपये आहे. एवढंच नाहीतर या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर या नेकलेसची किंमत 8,33,80,000 रुपये नमूद करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रियांका हिच्या नेकलेसची चर्चा रंगत आहे.
प्रियांका चोप्रा हिचे आगामी सिनेमे
प्रियांका चोप्रा लवकरच फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात प्रियांका हिच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ, आलिया भट्ट देखील महत्त्वाचच्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियामुळे देखील प्रियांका कायम चर्चेत असते. अभिनेत्री कायम मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.