Priyanka Chopra | अवघ्या दीड वर्षांच्या मालतीकडे आहे तब्बल इतक्या लाखांची बॅग, प्रियांकाच्या लेकीचा शाही थाट, लोक हैराण
बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडवर काही गंभीर आरोप केले. प्रियांका चोप्रा हिने केलेल्या आरोपांनंतर अनेकांना मोठा धक्का बसला. प्रियांका चोप्रा हिच्यानंतर अनेक स्टारने देखील बाॅलिवूड आरोप केले. काही लोक हे प्रियांका चोप्रा हिच्यासाठी मैदानात उतरले.
मुंबई : प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने थेट बाॅलिवूडमधील काळ्या सत्याबद्दल सांगितले. कशाप्रकारे बाॅलिवूडमधून आपल्याला एका कोपऱ्यात ढकलण्याचे काम सुरू होते हे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली होती. इतकेच नाही तर यावेळी प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडमधील (Bollywood) राजकारणावर देखील मोठे भाष्य केले होते. बाॅलिवूडमधील राजकारणामुळे आपल्याला चित्रपटांमध्ये काम भेटत नसल्याचे देखील प्रियांका चोप्रा हिने सांगितले. शेवटी या सर्व राजकारणाला कंटाळूनच आपण थांबण्याचा निर्णय घेतल्याचे प्रियांका चोप्रा हिने सांगितले.
प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडवर केलेले गंभीर आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. प्रियांका चोप्रा हिने निक जोनस याच्यासोबत 2018 मध्ये लग्न केले. निक जोनस याच्यासोबत लग्न केल्यापासून प्रियांका चोप्रा ही विदेशात आहे. फक्त तीन वेळा लग्न झाल्यापासून प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये आलीये. निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांची एक मुलगी देखील आहे.
निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांच्या मुलीचे नाव मालती मेरी असे आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा ही सतत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय दिसत आहे. प्रियांका चोप्रा ही नेहमीच मुलगी मालती हिच्यासोबतचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा ही मालती हिला घेऊन विदेशात रस्त्याने फिरताना देखील दिसली होती.
नुकताच प्रियांका चोप्रा हिने काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मालती ही दिसत आहे. एका हाॅटेलमधील हे फोटो असल्याचे सांगितले जात आहेत. मात्र, या फोटोमुळे मालती मेरी ही प्रचंड चर्चेत आलीये. प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये मालती एकदम गोड दिसत आहे. हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये मालती ही एका हॅंडबॅगसोबत खेळताना दिसत आहे. मात्र, मालती ज्या हॅंडबॅगसोबत खेळत आहे. ती हॅंडबॅग अशी तशी नसून अत्यंत महागडी आहे. त्या हॅंडबॅगची किंमत ऐकून आता सर्वजण हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. मालती खेळत असलेल्या हॅंडबॅगची किंमत तब्बल 2.45 लाख रूपये आहे. मालती खेळत असलेली बॅग Bulgari Serpenti Forever Crossbody ची असून तिची किंमत 2.45 लाख रूपये आहे.