Video | प्रियांका चोप्रा हिच्या लेकीच्या व्हिडीओवर चाहते फिदा, मालतीने थेट…
प्रियांका चोप्रा हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. प्रियांका चोप्रा ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही जोरदार चर्चेत असते. प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
मुंबई : प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही विदेशात असूनही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. प्रियांका चोप्रा हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना प्रियांका चोप्रा दिसली. इतकेच नाही तर प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडमधील (Bollywood) थेट काळे सत्य सांगितले. तिने गंभीर आरोप केले. प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडमधील राजकारणावर खुलासा केला.
प्रियांका चोप्रा ही नेहमीच मुलगी मालती मेरी हिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच मालती हिचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये मालती ही आपल्या मित्रांसोबत धमाल करताना दिसली. आता नुकताच व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओंमुळे मालती मेरी ही तूफान चर्चेत आलीये.
View this post on Instagram
प्रियांका चोप्रा हिच्या लेकीचे काही खास व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये मालती मेरी हिला पाहून सर्वचजण हैराण झाले. प्रियांका चोप्रा आणि मालती मेरी या निक जोनस यांच्या शोमध्ये पोहचल्या. यावेळी मालती मेरी धमाल करताना दिसली. वडिलांना पाहून मालती मेरी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
एका व्हिडीओमध्ये मालती मेरी ही उपस्थित चाहत्यांना हॅलो करताना देखील दिसत आहे. हा कॉन्सर्ट जरी निक जोनस याचा असला तरीही लोकांच्या नजरा या फक्त आणि फक्त मालती मेरी हिच्यावर दिसल्या. कॉन्सर्टनंतर निक जोनस याने देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, कामाच्या दिवशी आपल्या कुटुंबाला घेऊन या…
View this post on Instagram
निक जोनस याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये मालती मेरी आणि प्रियांका चोप्रा या दिसत आहेत. आता निक जोनस याने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, प्रियांका चोप्रा हिने घेतलेला हा निर्णय अगदी योग्यच आहे. दुसऱ्याने लिहिले की, मला प्रियांका आणि निक जोनस यांची जोडी प्रचंड आवडते.