कोरोनाच्या काळात ग्लॅमरस फोटो शेअर करणे प्रियांका चोप्राला पडले महागात, ट्रोलर्स म्हणाले की….

अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

कोरोनाच्या काळात ग्लॅमरस फोटो शेअर करणे प्रियांका चोप्राला पडले महागात, ट्रोलर्स म्हणाले की....
प्रियांका चोप्रा
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 11:20 AM

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. यामुळेच तिचे चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात पसंत केले जातात. प्रियांका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. प्रियांकाने भारतातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव यावर चिंता व्यक्त करत लोकांना मदत मागत एक व्हिडीओ शेअर केला होता. (Priyanka Chopra’s photo trolled on social media)

नुकताच प्रियांकाने सोशल मिडियावर तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे प्रियांका जोरदार ट्रोल केलं जात आहे. प्रियांकाने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, मी आणि निक आता मॅक्स फॅक्टर ब्रँडचे ग्लोबल एंबेस्डर बनलो आहोत. हे सांगत प्रियांकाने व्हाइट ड्रेसमधील एक फोटो शेअर केला. हा फोटो तिच्या चाहत्यांना आवडला आहे. मात्र, हा फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केला जात आहे.

एका यूजरने प्रियांकाच्या फोटोवर कमेंट करत म्हटंले आहे की, लोक मरत आहेत आणि आपल्याला फोटो क्लिक करण्यात मजा येत आहे. मला तुमच्याकडून खरोखरच ही अपेक्षा नव्हती. प्रियंका चोप्रा आणि निक जोनस स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून भारतातील लोकांना मदत करत आहेत. भारताला कशी मदत करता येईल हे त्यांनी लोकांना सांगितले. याबाबत प्रियंकाने सांगितले की, ‘मी आणि निकने आमच्या वतीने योगदान दिले आहे. प्रत्येकजण सुरक्षित होईपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. मदतीसाठी अनेक लोक पुढे येत आहेत हे पाहून बरे वाटले.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर, प्रियांका चोप्राला शेवटी ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटात राजकुमार राव आणि आदर्श गौरवसोबत दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटामध्ये प्रियांकाच्या चित्रपटाचे नामांकन झाले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला. आता प्रियांका लवकरच अ‍ॅमेझॉन प्राइमची वेब सिरीज सिटाडेलमध्ये दिसणार आहे. या वेब सिरीजमझ्ये प्रियांका स्पाय थ्रिलर अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO | लेकाला वाचवण्यासाठी श्वेता तिवारी अक्षरशः लोळली, तरीही एक्स नवऱ्याने हिसकावलं

Video: ‘मी ह्या खाली मास्कचं काय करु?’ दिग्गज अभिनेता ऑक्सिजनशिवाय तडफडला, मरणापूर्वीचा शेवटचा Video समोर

Rakhi Sawant | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत, संघर्षमय प्रवासाला उजाळा देत म्हणाली…

(Priyanka Chopra’s photo trolled on social media)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.