साऊथचा ‘हा’ अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला

'मला मराठी भाषेची आणि संस्कृतीची ओळख...', साऊथचा 'हा' अभिनेता मराठी सिनेविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज... सर्वत्र आगामी सिनेमा आणि अभिनेत्याची चर्चा... अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक

साऊथचा 'हा' अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 2:51 PM

मुंबई : आतापर्यंत अनेक मराठी कलाकाल बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये झळकले. पण आता साऊथचा हा अभिनेता मराठी सिनेविश्वात पादार्पण करणार आहे. ‘सरी’ सिनेमातून अभिनेता मराठी सिनेविश्वात महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणार आहे. मराठी विश्वात पदार्पण करणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेत्री पृथ्वी अंबर आहे. कन्नड, तुल्लू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवल्यानंतर पृथ्वी अंबर आता मराठी सिनेमात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या सर्वत्र पृथ्वी अंबर याची चर्चा आहे. अभिनेत्याने मराठीतील पदार्पणाबद्दल मोठं वक्तव्य देखील केलं आहे.

पृथ्वी अंबर, अशोका के. एस. यांच्या ‘सरी’ या सिनेमातून पृथ्वी मराठी सिनेसृष्टीत प्रवेश करत आहे. ‘सरी’ सिनेमा प्रेम कथे भोवती फिरणारा आहे. सिनेमात पृथ्वी अंबर याच्यासोबत अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणि मृणाल कुलकर्णी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सिनेमात पृथ्वी कोणती भूमिका साकारताना दिसणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

आपल्या मराठीतील पदार्पणाबद्दल पृथ्वी अंबर म्हणतो, ‘माझा जन्म कर्नाटकातील उडुपी येथे झाला असला तरी प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला भेट देणे ही माझ्यासाठी एक परंपराच होती आणि त्यामुळेच मला मराठी भाषेची आणि संस्कृतीची ओळख झाली. माझे खूप असे जवळचे नातेवाईक आणि मित्र आहेत, जे मराठी भाषा बोलणारे आहेत. ‘

हे सुद्धा वाचा

आवडत्या मराठी सिनेमांबद्दल अभिनेता म्हणाला, ‘नटरंग, नटसम्राट आणि सैराट सारख्या अभिजात सिनेमांचा मी चाहता आहे. सर्वोत्कृष्ट अभिनय, कलाकार आणि संगीतासाठी हे सिनेमे मी सतत पाहतो. मी कधी कल्पनाही केली नव्हती की, मी मराठी चित्रपटात काम करेन.’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणि कायमच मला आवडणाऱ्या मृणाल कुलकर्णी मॅम यांच्यासारख्या अत्यंत प्रतिभावान कलाकारांसोबत मराठी सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

सध्या सर्वत्र ‘सरी’ मराठी सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमा ५ मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य सिनेमात अभिनेता झळकणार असल्यामुळे साऊथचे चाहते देखील अभिनेत्याला मराठी सिनेमात पाहाण्यासाठी उत्सुक आहेत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.