MC Stan | पुण्याचे ‘गोल्डन बॉइज’ एमसी स्टॅनला म्हणाले ‘घमंडी’; “आज त्याच्याकडे प्रसिद्धी आहे पण..”

तुझ्या या प्रतिक्रियेमुळे एमसी स्टॅनला वाईट वाटलं तर, असं सनीला पुढे विचारण्यात आलं. त्यावर संजय गुजर म्हणाला, "नाही, त्याला वाईट वाटणार नाही. कारण तो आम्हाल मोठा भाऊ मानतो."

MC Stan | पुण्याचे 'गोल्डन बॉइज' एमसी स्टॅनला म्हणाले 'घमंडी'; आज त्याच्याकडे प्रसिद्धी आहे पण..
एमसी स्टॅन, गोल्डन बॉईजImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 5:01 PM

मुंबई : ‘बिग बॉस 16’चा विजेता एमसी स्टॅन गेल्या काही दिवसांपासून अब्दु रोझिकसोबतच्या भांडणामुळे चर्चेत आहे. अब्दुने एमसी स्टॅनवर बरेच आरोप केले होते. आता या दोघांच्या भांडणावर पुण्याच्या ‘गोल्डन बॉइज’ची प्रतिक्रिया समोर आली आहे. सनी वाघचौरे आणि संजय गुजर हे दोघं ‘गोल्डन बॉइज’ म्हणून ओळखले जातात. या दोघांना नुकतंच पापाराझींनी मुंबईत पाहिलं. त्यावेळी त्यांना एमसी स्टॅनवर प्रतिक्रिया देण्यास विचारण्यात आलं होतं. स्टॅन आता फार घमंडी झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

एमसी स्टॅन आणि अब्दु रोझिक यांचं भांडण कशामुळे झालं असं तुम्हाला वाटतं, असा प्रश्न पापाराझींनी सनी आणि संजय यांना विचारला. त्यावर सनी वाघचौरे म्हणाला, “त्याने असं वागायला पाहिजे नव्हतं. स्टॅनमध्ये आता जरा ॲटिट्यूड आला आहे. लोकांवर प्रेम करणं गरजेचं असतं. प्रसिद्धी काय आज आहे तर उद्या नाही. तुमच्यासोबत जे लोक आहेत त्यांचा तुम्ही आदर केला पाहिजे. जर तो असाच वागत राहिला तर पुढे त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागेल.”

तुझ्या या प्रतिक्रियेमुळे एमसी स्टॅनला वाईट वाटलं तर, असं सनीला पुढे विचारण्यात आलं. त्यावर संजय गुजर म्हणाला, “नाही, त्याला वाईट वाटणार नाही. कारण तो आम्हाल मोठा भाऊ मानतो.” तर सनी म्हणाला, “त्याला वाईट वाटलं तर वाटू दे. स्टॅनला आमचा काही प्रॉब्लेम नाही, पण त्याला मॅनेज करणाऱ्या कंपनीला आहे.” गोल्डन बॉइज म्हणून ओळखले जाणारे सनी वाघचौरे आणि संजय गुजर हे दोघं बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅनला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. हे तिघं बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखतात.

हे सुद्धा वाचा

बिग बॉस 16 चा माजी स्पर्धक अब्दु रोझिक आणि स्टॅनचा वादही टोकाला गेला आहे. अब्दुने एमसी स्टॅनच्या शोला हजेरी लावून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा त्याच्या मॅनेजरकडे व्यक्त केली होती. मात्र अब्दुने शोच्या ठिकाणी राहू नये, अशी स्टॅनची इच्छा असल्याचं सेक्युरिटी टीम आणि आयोजकांनी सांगितलं. स्टॅनच्या टीमकडून काहीतरी गैरसमज झाला असावा असं समजून अब्दु त्याठिकाणी सामान्य पाहुण्याप्रमाणे तिकिट विकत घेऊन गेला होता. मात्र एमसी स्टॅनच्या मॅनेजमेंट टीमकडून अब्दुला अत्यंत वाईट वागणूक मिळाली. त्यांनी अपशब्द वापरले आणि अब्दुच्या कारचंही नुकसान केलं, असा आरोप सोशल मीडियावरील पोस्टद्वारे करण्यात आला होता. ही पोस्ट अब्दुच्या टीमकडून पोस्ट करण्यात आली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.