सलमान संग फील ले रहा है… प्रसिद्ध गायकाच्या घरावर धाड धाड गोळीबार, सर्वच हादरले; व्हायरल पोस्टमध्ये काय?

| Updated on: Sep 02, 2024 | 9:16 PM

गेल्या काही दिवसांपासून गायकांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. हेच नाही तर आता एका प्रसिद्ध गायकाच्या घरावर गोळीबार करण्यात आलाय. हनी सिंह याला देखील काही दिवसांपूर्वीच थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तेंव्हापासून हनी सिंह हा अधिक वेळ विदेशात घालवतो.

सलमान संग फील ले रहा है... प्रसिद्ध गायकाच्या घरावर धाड धाड गोळीबार, सर्वच हादरले; व्हायरल पोस्टमध्ये काय?
AP Dhillon
Follow us on

नुकताच एक अत्यंत हैराण करणारी घटना पुढे येताना दिसत आहे. या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. एका प्रसिद्ध गायकाच्या घरावर थेट फायरिंग करण्यात आलीये. या घटनेची संपूर्ण जबाबदारी ही लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीकडून करण्यात आलीये. हेच नाही तर या गोळीबारानंतर थेट एक हैराण करणारी पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये. या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे देखील बघायला मिळतंय. या पोस्टमध्ये सलमान खानच्या नावाचा उल्लेखही करण्यात आलाय. लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीच्या निशाण्यावर गायक असल्याचे बघायला मिळतंय. लॉरेन्स बिश्नोईच्याच टोळीकडून सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली. 

प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लो याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आलाय. एपी ढिल्लोचे घर कॅनडातील व्हँकुव्हर व्हिक्टोरिया येथे आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. हेच नाही तर गोळीबाराचा व्हिडिओही समोर आला. व्हिडीओ जरी पुढे आला असला तरीही असूनही गोळीबार करणाऱ्यांची ओळख ही पटू शकली नाहीये. 

लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीमधील रोहित गोदाराने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. या गोळीबारानंतर पोस्ट शेअर करत लिहिण्यात आले की, व्हिक्टोरिया आयलॅंडवर एपी ढिल्लोचे घर आहे. तो खूप फिलिंग घेत होता…सलमान खानला गाण्यात घेऊन…तुम्ही ज्या अंडरवर्ल्ड लाइफची कॉपी करत आहात तेच खरे आम्ही जगत आहोत…औकातमध्ये राहा…नाही तर मारून टाकले जाईल..

या गोळीबारानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागलीये. मात्र, दुसरीकडे ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. याआधीही गोल्डी आणि लॉरेन्स टोळीने काही महिन्यांपूर्वी विदेशात गिप्पी ग्रेवालच्या घरी गोळीबार केला होता. यावर कॅनडाच्या पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया ही दिली गेली नाहीये. 

लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून सतत सलमान खान याला देखील जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. काही दिवसांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई याने जेलमधून एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिश्नोई याने थेट म्हटले होते की, मी अजून गॅंगस्टर झालो नाहीये…मी ज्यादिवशी सलमान खान याला जीवे मारेल, त्यादिवशीच मी गॅंगस्टर होईल.