Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’मध्ये डबल धमाका? ‘हा’ साऊथ सुपरस्टार करणार स्क्रीन शेअर

'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनसोबत दिसणार साऊथचा 'हा' लोकप्रिय अभिनेता?

Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'मध्ये डबल धमाका? 'हा' साऊथ सुपरस्टार करणार स्क्रीन शेअर
'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनसोबत दिसणार साऊथचा 'हा' लोकप्रिय अभिनेता?Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 1:18 PM

हैदराबाद: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर प्रेक्षकांना सीक्वेलची उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. गेल्या प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात आपली छाप सोडली. पुष्पाचे डायलॉग्स, गाणी सर्वत्र चर्चेत राहिले. सोशल मीडियावर त्यावरून मीम्स आणि रिल्स व्हायरल होऊ लागले. पुष्पा 2 मध्ये डबल धमाका करण्यासाठी निर्माते एका लोकप्रिय अभिनेत्याला ऑफर देत असल्याचं कळतंय.

पुष्पा 2 ची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये त्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. आता यामध्ये अल्लू अर्जुनसोबत आणखी एक साऊथ सुपरस्टार दिसणार असल्याचं समजतंय. हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसून मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण आहे.

हे सुद्धा वाचा

12 डिसेंबरपासून पुष्पा 2 च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. पहिल्या भागापेक्षाही उत्तम दुसरा भाग असावा यासाठी निर्माते विचारात आहेत. म्हणूनच सीक्वेलमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहू नये याची काळजी ते घेत आहेत. सुकुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. RRR स्टार रामचरण या सीक्वेलमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

रामचरणने ऑफर स्वीकारली की नाही, याबद्दल अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र जर रामचरणने ही ऑफर स्वीकारली तर प्रेक्षकांसाठी हा डबल धमाकाच असेल. रामचरण आणि सुकुमार यांनी रंगस्थलम या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.

पुष्पा: द राईज या चित्रपटातही स्टार कॅमिओचा फंडा वापरण्यात आला होता. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला खुद्द अल्लू अर्जुनने विनंती केली होती. त्यानंतर तिने करिअरमधला पहिला आयटम साँग ‘पुष्पा’ या चित्रपटासाठी केला होता. समंथा आणि अल्लू अर्जुनचं ‘ऊ अंटावा’ हे गाणं तुफान गाजलं होतं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.