सर्वात महागडा करार; ‘पुष्पा 2 द रुल’ राइट्ससाठी ‘या’ प्लॅटफॉर्मने मोजले इतके कोटी

"अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रूल'ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. हा चित्रपट 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान आता हा चित्रपट लवकरच OTT वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. एका प्लॅटफॉर्मने या चित्रपटाचे ओटीटी राइट्ससाठी खरेदी करण्यासाठी मोठी किमंत मोजली आहे.

सर्वात महागडा करार; 'पुष्पा 2 द रुल' राइट्ससाठी 'या' प्लॅटफॉर्मने मोजले इतके कोटी
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 6:53 PM

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2 द रुल’ हा चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडिस काढले आहे. या चित्रपटाने देशभरात तब्बल 1000 कोटींच्या पुढे कमाई केली. हा या वर्षीचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. एवढचं नाही तर चित्रपटाला रिलीज होऊनही आता 2 आठवडे होऊन गेले असले तरीही चित्रपटाची क्रेझ कमी होताना दिसत नाहीये.

ओटीटी प्रदर्शनाबाबत मोठी माहिती

प्रेक्षक या चित्रपटाला पैसा वसूल म्हणत आहेत. तर अल्लू अर्जुनच्या परफॉर्मन्सला फायर नाही तर वाइल्ड फायर म्हणत आहेत. चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचत असतानाच त्याच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. प्रेक्षक आता हा चित्रपट OTT वर येण्याची वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे कारण रिपोर्टनुसार या चित्रपटाचे राइट्स एका ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहेत.

‘पुष्पा 2 द रुल’ राइट्स तब्बल ‘इतक्या’ कोटींना 

यावरून हा चित्रपट लवकरच आता OTTवर रिलीज होणार असल्याचे संकेत आहेत. एका रिपोर्ट्सनुसार, नेटफ्लिक्स इंडियाने सर्व भाषांसाठी ‘पुष्पा 2 द रुल’ चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स विकत घेतले असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी त्यांना 270 कोटी रुपये द्यावे लागले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरच हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

OTT वर रिलीज कधी?

हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रत्येक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर येतो. म्हणजे हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येण्याची शक्यता आहे.

‘पुष्पा 2 द रुल’चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखनही त्यांनी केले आहे. या चित्रपटाचे सहलेखन श्रीकांत विसा यांनी केले आहे. मायथ्री मूव्ही मेकर्स बॅनरचे नवीन येरनेनी आणि यलमांचिली रविशंकर निर्मित, या चित्रपटाचे संकलन कार्तिक श्रीनिवास आणि रुबेन यांनी केले आहे. पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुनने पुष्पराजच्या भूमिकेत, रश्मिका मंदानाने श्रीवल्लीच्या भूमिकेत आणि फहद फासिलने भंवर सिंग शेखावतच्या भूमिकेनं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.चित्रपट अजूनही दररोज कोट्यवधी रुपयांचे कलेक्शन करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

 

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.