Pushpa 2 मध्ये श्रीवल्लीची हत्या होणार? रश्मिका मंदानाच्या भूमिकेबद्दल काय म्हणाले निर्माते?

यातील डायलॉग असो किंवा मग अल्लू अर्जुनचा डान्स.. सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा झाली. फक्त चाहतेच नाही तर सेलिब्रिटीसुद्धा त्या डायलॉग आणि डान्स स्टेप्सवरून व्हिडीओ शेअर करू लागले होते.

Pushpa 2 मध्ये श्रीवल्लीची हत्या होणार? रश्मिका मंदानाच्या भूमिकेबद्दल काय म्हणाले निर्माते?
PushpaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 5:19 PM

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाची (Rashmika Mandanna) मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. या चित्रपटाने कमाईचे नवीन विक्रम रचले. यातील डायलॉग असो किंवा मग अल्लू अर्जुनचा डान्स.. सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा झाली. फक्त चाहतेच नाही तर सेलिब्रिटीसुद्धा त्या डायलॉग आणि डान्स स्टेप्सवरून व्हिडीओ शेअर करू लागले होते. ‘पुष्पा’ हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार असल्याचं निर्मात्यांनी आधीच जाहीर केलं होतं. पहिल्या भागानंतर आता प्रेक्षकांना पुष्पाच्या सीक्वेलची (Pushpa 2) प्रचंड उत्सुकता आहे. याच सीक्वेलबद्दलची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुष्पाच्या सीक्वेलमध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेची हत्या होणार असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यावर आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुष्पा या चित्रपटाचे निर्माते वाय. रवी शंकर यांनी ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “त्या केवळ अफवा आहेत. हा निव्वळ मूर्खपणा आहे. खरं सांगायचं झाल्यास अद्याप आम्हीच चित्रपटाची कथा ऐकली नाही. सोशल मीडियावर ही अफवा पसरवली जात आहे. सध्या सीक्वेलच्या कथेबद्दल कोणालाच काही माहित नसल्याने सोशल मीडियावर काहीही लिहिलं तरी ते व्हायरल होणार आणि त्यावर लोक विश्वास ठेवणार. पण त्यात काही तथ्य नाही.”

हे सुद्धा वाचा

पहा रश्मिकाचा व्हिडीओ-

पुष्पाच्या सीक्वेलमध्ये रश्मिकाची भूमिका असणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. ऑगस्ट महिन्यात पुष्पा 2च्या शूटिंगची सुरुवात होणार आहे. दुसरीकडे रश्मिका सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी उत्सुक आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. याशिवाय ती विकास बहलच्या ‘गुडबाय’ या चित्रपटातही काम करणार आहे. यामध्ये ती बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूमिका साकारणार आहे. रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. बॉलिवूडशिवाय रश्मिका विजय थलपतीच्या चित्रपटातही काम करणार असल्याचं कळतंय.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.