अभिनेत्रीचं मृत्यू प्रकरण, ‘पुष्पा’ फेम अभिनेत्याला गुन्हा कबूल, अभिनेत्रीच्या प्रायव्हेट फोटोंसोबत…

Pushpa : 'पुष्पा' फेम अभिनेत्याच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्रीने संपवलं स्वतःचं आयुष्य... अभिनेत्रीच्या प्रायव्हेट फोटोंमध्ये असं काय होतं, ज्यामुळे तिने उचललं टोकाचं पाऊल, सत्य समोर... सध्या सर्वत्र घडलेल्या घटनेची चर्चा... अभिनेत्याने गुन्हा कबूल केल्यानंतर...

अभिनेत्रीचं मृत्यू प्रकरण, 'पुष्पा' फेम अभिनेत्याला गुन्हा कबूल, अभिनेत्रीच्या प्रायव्हेट फोटोंसोबत...
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 11:46 AM

मुंबई | 19 डिसेंबर 2023 : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘पुष्पा’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. ‘पुष्पा’ सिनेमात भूमिका बजावलेल्या सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. पण सिनेमातील एक अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘पुष्पा’ सिनेमात ‘केशव’ या भूमिकेला न्याय देणारा अभिनेता जगदीश प्रताप बंदरी याला पोलिसांनी अटक केली आहे. ज्युनियर अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी जगदीश प्रताप बंदरी याला अटक केली आहे. अभिनेत्याने स्वतःचा गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई केली. जगदीश प्रताप बंदरी याच्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून अभिनेत्रीने 29 नोव्हेंबर रोजी स्वतःला संपवलं.

जगदीश प्रताप बंदरी याने केलेल्या कृत्याची माहिती समोर आल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. आपण ज्याला इतकं प्रेम दिलं त्याने मोठा गुन्हा केला आहे… यावर चाहत्यांचा विश्वासच बसत नाहीये. सध्या ज्या घटनेची चर्चा रंगत आहे, ती घटना 29 नोव्हेंबर रोजी घडली आहे.

जगदीश प्रताप बंदरी याच्या त्रासाला कंटाळलेल्या एक ज्युनियर अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य संपवलं. त्यानंतर अभिनेत्रीच्या वडिलांना पोलिसांत तक्रार दाखल केली. जगदीश प्रताप बंदरी अभिनेत्रीच्या प्रायव्हेट फोटोंचा वापर करुन तिला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली. धक्कादायक घटना म्हणजे जगदीश प्रताप बंदरी याने अन्य एका पुरुषासोबत अभिनेत्रीने गुपचूप फोटो काढले होते.

हे सुद्धा वाचा

संबंधीत प्रकरणाचा तपास केल्यानंतर, जगदीशला पुंजागुट्टा पोलिसांनी ताब्यात घेतलं. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. TV9 च्या एका रिपोर्टनुसार, चौकशीदरम्यान जगदीश याने गुन्ह्याची कबुली दिली असून, चुकीच्या उद्देशाने महिलेचे फोटो काढल्याचे कबूल केलं आहे. त्याने ज्युनियर अभिनेत्रीला फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केलं होतं.

जगदीश प्रताप बंदरी याने असं का केलं?

जगदीश प्रताप बंदरी याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जगदीश अभिनेत्रीवर प्रचंड प्रेम करत होता. पण अभिनेत्री दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात होती. या गोष्टीचा सामना करु न शकल्यामुळे जगदीश याने अभिनेत्रीला धमकावण्यास सुरुवात केली. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. घडलेल्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.