Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fahadh Faasil: “पायरेटेड कॉपी का असेना पण प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा”; ‘पुष्पा’ फेम अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

पुष्पा या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला फहाद त्याच्या दमदार अभिनयामुळे चर्चेत आला आहे. कमल हासनच्या 'विक्रम' या चित्रपटात तो एजंटच्या भूमिकेत होता.

Fahadh Faasil: पायरेटेड कॉपी का असेना पण प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा; 'पुष्पा' फेम अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
'पुष्पा' फेम अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 3:48 PM

‘पुष्पा: द राईज’ (Pushpa) आणि ‘विक्रम’ (Vikram) या दोन्ही यशस्वी चित्रपटांनंतर आता अभिनेता फहाद फासिलचा (Fahadh Faasil) ‘मलयंकुंजू’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. थिएटर्समधील मोजक्या स्क्रीन्सवर प्रदर्शित झाल्यानंतर दोन आठवड्यातच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जात आहे. सोमवारी (8 ऑगस्ट) फहादच्या 39व्या वाढदिवसानिमित्त याची घोषणा करण्यात आली. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतील फहादचं वक्तव्य विशेष चर्चेत आलं आहे. या मुलाखतीत त्याने प्रेक्षकांना पायरेटेड कॉपी का असेना पण त्याचे चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.

मलयंकुंजू हा चित्रपट आधी फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपटाचा फर्स्ट कट पाहिल्यानंतर फहादने थिएटरमध्ये ठराविक स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल तो म्हणाला, “माझ्याकडे जर पर्याय असता, तर मी चित्रपटाचा पहिला अर्धा भाग ओटीटीवर आणि दुसरा भाग हा थिएटरमध्ये प्रदर्शित केला असता. त्या दृष्टीने मी चित्रपटाकडे पाहिलं. चित्रपटातील बारकावे खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. म्युझिकल आणि सर्व्हायव्हल थ्रिलर असलेल्या या चित्रपटासाठी किमान थिएटरचा अनुभव खूप महत्त्वाचा असेल. शिवाय केरळ सध्या अशा टप्प्यातून जात आहे जिथे लोक जास्त ड्रामा नसलेल्या चित्रपटांबद्दल फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे आपण नेमके कुठे उभे आहोत हे पाहण्यासाठी ती जणू पाण्याची केलेली चाचणीही होती.”

हे सुद्धा वाचा

ओटीटी चांगलं कि थिएटर या वादात पडायची इच्छा नाही असं सांगत फहाद पुढे म्हणाला, “चित्रपटाचा आनंद कुठेही लुटता येतो. माझी एवढीच इच्छा आहे की लोकांनी माझा चित्रपट पाहावा, मग ते चित्रपटगृहात असो किंवा मग घरात. जरी ते पायरेटेड कॉपी पाहत असले तरी ते चांगल्या प्रिंटचा चित्रपट पाहतील अशी आशा आहे.”

पुष्पा या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला फहाद त्याच्या दमदार अभिनयामुळे चर्चेत आला आहे. कमल हासनच्या ‘विक्रम’ या चित्रपटात तो एजंटच्या भूमिकेत होता. फहादने केरळमधील एसडीव्ही सेंट्रल स्कूल, चॉइस स्कूल आणि लॉरेन्स स्कूल उटी इथून शालेय शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्याने केरळमधील सनातन धर्म महाविद्यालयातून पदवी आणि अमेरिकेतील मियामी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. फहाद हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. 2002 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. परंतु त्याचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला होता. पुष्पा आणि विक्रम या चित्रपटांमुळे त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.