Pushpa The Rule: ‘पुष्पा २’ सिनेमातील अल्लू अर्जुनच्या निळ्या साडीमागील रहस्य अखेर समोर

जाणून घेवू 'पुष्पा २' सिनेमातील अल्लू अर्जुनच्या निळ्या साडीमागील रहस्य नक्की काय आहे. अभिनेत्याला साडीसह कपाळावर मोठी टिकली आणि गळ्यात लिंबाचा हार पाहून चाहते हैराण...

Pushpa The Rule: 'पुष्पा २' सिनेमातील अल्लू अर्जुनच्या निळ्या साडीमागील रहस्य अखेर समोर
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 4:55 PM

मुंबई : ‘पुष्पा’ सिनेमाच्या यशानंतर चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त ‘पुष्पा २’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ‘पुष्पा २’ सिनेमाचा ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांच्या मनात सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते हैराण झाले. सिनेमातील अभिनेता अल्लू अर्जुन याचा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. साडीसह कपाळावर मोठी टिकली आणि गळ्यात लिंबाचा हार पाहून अभिनेत्याच्या लूकवर चाहत्यांचा विश्वासच बसत नव्हता. अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं. ‘अल्लू अर्जुन याने असा लूक का केला आहे?’ असा प्रश्न अनेक चाहत्यांनी विचारला. आता अभिनेत्याच्या फोटोमधील लूकचं सत्य समोर आलं आहे.

आज जाणून घेवू ‘पुष्पा २’ सिनेमातील अल्लू अर्जुनच्या निळ्या साडीमागील रहस्य नक्की काय आहे. अभिनेत्याच्या नव्या आणि वेगळ्या लूकला चाहते वेग-वेगळ्या अनुशंगाने पाहत आहेत. तिरुपतीच्या लोकप्रिय लोक अनुष्ठान गंगम्मा तल्ली सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्याला स्त्रीच्या रूपात तयार करण्यात आल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सण दरवर्षी मे महिन्याच्या जवळपास आठवडाभर साजरा केला जातो.

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार, सणाच्या शेवटच्या दिवशी पुरुष महिलांप्रमाणे तयार होतात आणि गंगम्माच्या रुपात दिसतात. जे वईट गोष्टींचा नाश करण्यासाठी ओळखले जातात. एवढंच नाही तर पुष्पा सिनेमाचे दिग्दर्शक कुमार यांनी जबरदस्त सिनेमात अॅक्शन सीन दाखवण्यासाठी या उत्सवाला केंद्रस्थानी ठेवलं आहे. ज्यामुळे प्रेक्षकांच मनोरंजन होणार आहे. सध्या सर्वत्र ‘पुष्पा २’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

‘पुष्पा २’ सिनेमाच्या टीझर आणि अभिनेत्याचा सिनेमातील फर्स्ट लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहेत. टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. आता सध्या अभिनेत्याच्या दमदार पोस्टरची चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याला ओळखणं देखील कठीण आहे.

चाहत्यांच्या मनात ‘पुष्पा २’ सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘पुष्पा’ सिनेमाला चाहत्यांचं भरभरु प्रेम मिळालं. आता ‘पुष्पा २’ चाहत्यांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरणार की नाही? हे सिनेमाचा बॉक्स ठरवेल… पण सिनेमा कधी प्रदर्शित होणार, याबद्दल माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Allu Arjun Pushpa 2 The Rule Look)

‘पुष्पा’ आजही सिनेमातील अनेक डायलॉग चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे, पण ‘पुष्पा’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियेत प्रचंड वाढ झाली आहे. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आता चाहते ‘पुष्पा २’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.