R Madhavan love story : प्रेम (Love) आयुष्यातील कधीही न विसरता येणारी भावना आहे… प्रेम ही एक अशी गोष्टी जी फक्त आपण अनुभवू शकतो. सिनेमांमध्ये आपण अनेक प्रेम कहाणी पाहातो. पण मोठ्या पडद्यावर जे कलाकार रिल लाईफ मधील लव्हस्टोरी प्रेक्षकांसमोर मांडतात, त्याच कलाकारांच्या खासगी आयुष्यातील लव्ह स्टोरी देखील तितकीच खास आहे. अभिनेता आर माधवन (r. madhavan) याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने त्याच्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. चाहत्यांसाठी अभिनेता जेवढा खास तेवढीच खास आर माधवन याची लव्हस्टोरी आहे. आर माधवन चक्क त्याच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला होता. (Love Life)
एक विद्यार्थीनी आणि शिक्षकामधील लव्हस्टोरी फार रोमांचक आहे. आर माधवन आणि पत्नी सरिता (sarita birje) यांच्या प्रेमाची सुरुवात एका वर्कशॉपपासून झाली. त्यानंतर आर माधवन आणि सरिता कधीही विभक्त झालं नाही. पण दिवसागणिक त्यांचं नातं आणखी घट्ट झालं. इलेक्ट्रोनिक्स विषयात पदवी मिळवल्यानंतर आर माधवन याने देशभरात कम्यूनिकेशन आणि पब्लिक स्पीकिंग या विषयावर क्लास देण्यास सुरुवात केली.
कोल्हापूर याठिकाणी झालेल्या एका वर्कशॉपमध्ये आर माधवन आणि सरिता यांची ओळख झाली. नंतर पहिल्या ओळखीचं मैत्रीत आणि मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. एक शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या लव्हस्टोरीची सुरुवात कोल्हापूरमध्ये झालेल्या वर्कशॉपपासून झाली. आज आर माधवन आणि सरिता यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेवू. (r. madhavan directed movies)
एयर होस्टेस म्हणून स्वतःची ओळख तयार करण्यासाठी सरिता प्रयत्न करत होती. ज्यासाठी सरिता कोल्हपूर याठिकाणी आर माधवन याच्या लेक्चरसाठी आली होती. लेक्चर झाल्यानंतर मुलाखत देखील झाली. मुलाखतीत यश मिळाल्यानंतर सरिता, आर माधवन याचे आभार मानण्यासाठी त्याच्याकडे डीनर डेटसाठी मागणी केली. (r. madhavan love story)
पहिल्या डेटबद्दल खुद्द आर माधवन याने एका मुलाखतीत सांगितलं, ‘सरिता माझी विद्यार्थीनी होती. एक दिवस तिने मला डेटवर येण्यास सांगितलं. मी विचार केला संधी चालून आली आहे… नंतर कधी लग्न करणार की नाही माहित नाही… त्यामुळे मी सरितासोबत डेटसाठी गेलो आणि सरितासोबत लग्न केलं…’ असं अभिनेता म्हणाला..
आर माधवन आणि सरिता यांनी एकमेकांना तब्बल आठ वर्ष डेट केल्यानंतर १९९९ साली लग्न केलं. तामिळ पद्धतीत मोठ्या थाटात दोघांचा विवाह संपन्न झाला. आता अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान तयार केलं आहे.