चित्रपटाच्या सेटवर स्वत: दारू पित आमिर खानने ‘या’ कलाकारांनाही पाजली दारू, पुढे जे घडले ते अत्यंत..
बाॅलिवूड अभिनेता आमिर खान याने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आमिर खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आमिर खान हा दोन वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर राहिला. आमिर खान याने एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना आमिर खान हा दिसला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. आमिर खान हा मुंबई सोडून चेन्नईला शिफ्ट होणार असल्याची मध्यंतरी चर्चा होती, ज्यानंतर त्याचे चाहते हैराण झाले. मात्र, चेन्नईला आईच्या उपचारासाठी जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर तो मोठ्या पडद्यापासून दूर गेला. लाल सिंह चड्ढा चित्रपटाकडून आमिर खानला मोठ्या अपेक्षा होत्या. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल थेट बोलताना देखील आमिर खान हा दिसला. आमिर खान याच्याकडून काही मोठे खुलासे देखील करण्यात आले.
आमिर खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत. आमिर खान याच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे थ्री इडियट्स हा देखील आहे. थ्री इडियट्स या चित्रपटाने धमाका केला. थ्री इडियट्स चित्रपटात आमिर खान हा मुख्य भूमिकेत होता. आमिर खान याच्यासोबत आर माधवन आणि शरमन जोशी हे देखील थ्री इडियट्समध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसले.
नुकताच आता आर माधवनने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे हे आर माधवनकडून करण्यात आले. आर माधवन म्हणाला की, थ्री इडियट्स चित्रपटात एक सीन आहे, ज्यामध्ये रँचो, राजू आणि फरहान एकत्र कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या घरच्या दारासमोर जाऊन लघवी करतात. विशेष म्हणजे यावेळी तिघेही नशेत असल्याचे दाखवण्यात आले.
आर माधवनने सांगितले की, या सीनसाठी त्यांनी खरोखरच दारू पिली होती. विशेष म्हणजे हा सीन दारू पिऊन करण्याची आयडिया देखील आमिर खान याचीच होती. आमिर खानच्या म्हणण्यानुसार खरोखर दारू पिल्यानंतर हा सीन रिअल वाटेल. हा सीन रात्री नऊ वाजता शूट करण्याचे शेडयूल होते आणि हे तिघेही रात्री आठ वाजता दारू पिण्यास बसले.
दारू पिल्याने सीन शूट करण्यासाठी थोडा जास्त वेळ गेला. मात्र, तीन तासांमध्ये हा संपूर्ण सीन शूट झाला आणि या तिघांनी दारू नशेत सर्व डाॅयलाॅग आणि सीन शूट केला. थ्री इडियट्स चित्रपटाने कमाईमध्ये मोठा धमाका केला. 400 कोटींची कमाई थ्री इडियट्स चित्रपटाने केली. थ्री इडियट्सला चाहत्यांचे मोठे प्रेम हे नक्कीच मिळाले. आमिर खान हा थ्री इडियट्समध्ये एका वेगळ्याच लूकमध्ये बघायला मिळाला.