गंगामाईच्या रुपात रॅम्पवर अवतरली भारतीय मॉडेल ; मिस ग्रँड इंटरनॅशनलचा किताब पटकावलेल्या रेचल गुप्ताचे कौतुक
जालंधरची रेचेल गुप्ताने 'मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४'चा किताब जिंकून इतिहास रचला आहे. ती ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय आहे. ७० देशांच्या स्पर्धेत तिने तिच्या गंगामाईच्या रूपातल्या कॉस्ट्यूमने सर्वांचे लक्ष वेधले. रेचेल एक मॉडेल, अभिनेत्री आणि उद्योजिका आहे.
1 / 7
पंजाबमधील जालंधर येथील 20 वर्षीय मॉडेल रेचेल गुप्ताने देशाचे आणि राज्याचे नाव उंचावले आहे. रेचेल गुप्ताने 'मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४' चा किताब पटकावत इतिहास रचला आहे. 'मिस ग्रँड इंटरनॅशनल' जिंकणारी रेचेल ही पहिली भारतीय ठरली आहे.
2 / 7
2013 मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत ७० देश सहभागी झाले होते. या स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) पार पडली.
3 / 7
थायलँडच्या बँकॉकमध्ये MGI हॉलमध्ये वर्ल्ड फायनल दरम्यान पेरूच्या लुसियाना फस्टरने भारतीय मॉडेल रेचल गुप्ताला मुकूट घातला. या सोहळ्यात फिलीपिन्सची क्रिस्टीन जूलियन ओपियाजा फर्स्ट रनर-अप, म्यानमारची थाई सु न्येन, फ्रान्सची सफीतो कबेंगेले आणि ब्राझिलची तलिता हार्टमॅन ठरल्या.
4 / 7
या स्पर्धेत रेचेलने फिलिपाइन्सच्या क्रिस्टीन ज्युलियन ओपिएजाचा पराभव केला.
5 / 7
या स्पर्धेत मुख्य आकर्षण ठरलं ते रेचलने कॉस्ट्यूम राउंडमध्ये गंगामाईचे धारण केलेले रूप, गंगामाईच्या रुपातच ती रॅम्पवर अवतरली होती. तिच्या या आउटफिटचे फार कौतुक होत आहे.
6 / 7
या स्पर्धेपूर्वी रेचेलने पॅरिसमध्ये सुपर टॅलेंट ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड जिंकला होता. या स्पर्धेत ६० देशांतील ६० सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. तसेच तसेच रेचेल गुप्ताने ‘मिस ग्रँड इंडिया २०२४’ चा मुकुट जिंकला होता
7 / 7
रेचल एक मॉडल, अभिनेत्राी आणि बिझनेसवुमन आहे. तिची उंची ५ फूट १० इंच आहे. इंग्रजी, हिंदी, पंजाबी भाषेत ती पारंगत आहे.