Radhe Maa Son | वादग्रस्त राधे माँ यांचा मुलगा बॉलिवूडमध्ये; आईबद्दल अभिनेत्याच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ

वादग्रस्त राधे माँ यांचा मुलाच्या करियरची बॉलिवूडमध्ये दमदार सुरुवात, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झळकणार राधे माँ यांचा मुलगा.. पण आईबद्दल असं का म्हणाला अभिनेता?

Radhe Maa Son | वादग्रस्त राधे माँ यांचा मुलगा बॉलिवूडमध्ये; आईबद्दल अभिनेत्याच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 2:12 PM

मुंबई : अनेक प्रकरणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राधे माँ पुन्हा एका खास कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. स्वतःला राधेचा अवतार म्हणवणाऱ्या राधे माँ शिष्यांकडून स्वतःची पूजा करुन घेताना अनेकदा समोर आल्या. ‘बिग बॉस १४’ मध्ये राधे माँ झळकल्या आहेत. स्वतःच्या नावाने होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये नाचनाऱ्या राधे माँ यांना तुम्ही पाहिलं असेल. आता राधे माँ त्यांच्या शिष्यांमुळे नाही तर, त्यांच्या मुलामुळे चर्चेत आल्या आहेत. आज आपण राधे माँ यांच्या मुलाबद्दल जाणून घेणार आहोत. सध्या सर्वत्र राधे माँ यांच्या मुलाची चर्चा सुरु आहे. राधे माँ यांच्या मुलाचं नाव हरजिंदर सिंह (Harjinder Singh) आहे. हरजिंदर एक अभिनेता असून त्याने अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं आहे.

राधे माँ यांच्या मुलगा बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर चढत आहे. सध्या हरजिंदर त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. हरजिंदर लवकरच अभिनेता रणदीप हुड्डा याच्यासोबत ‘इंस्पेक्टर अविनाश’ (Inspector Avinash) या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. जियोसिनेमाच्या आगामी सीरिजमध्ये राधे माँ यांचा मुलगा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

हरजिंदर याच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. अभिनेत्याने त्याचं भूतकाळ गुपित ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हरजिंदर याला कोणी राधे माँ यांचा मुलगा म्हणून ओळखू नये यासाठी अभिनेता सतत प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरजिंदरला आपली ओळख आपल्या कामातून बनवायची आहे. यासाठी तो कठोर परिश्रम घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

हरजिंदर म्हणतो, ‘राधे माँ माझी आई आहे.. माझ्यासाठी ही फार गर्वाची गोष्ट आहे.. आईच्या नावाचा आधार घेऊन मी जर बॉलिवूडमध्ये पाय ठेवला तर मी संघर्ष करू शकत नाही. मला माझ्या अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात स्वतःची ओळख तयार करायची आहे. सिनेविश्वात मला यशाच्या उच्च शिखरावर पोहोचायचं आहे. मी माझ्या करियरची सुरुवात २०१३ साली केला.. आतापर्यंत मी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे..’ असं राधे माँ यांचा मुलगा हरजिंदर म्हणाला…

हरजिंदर याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर, ‘इंस्पेक्टर अविनाश’ (Inspector Avinash) एक ऍक्शन थ्रिलिंग सिनेमा आहे. वेब सीरिजमध्ये रणदीप हुड्डा इंस्पेक्टर अविनाश या भूमिकेत दिसणार आहे.. ही वेब सीरिज रिअल लाईफ इन्स्पेक्टर अविनाश मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गुन्ह्याविरुद्धच्या ऑपरेशनवर आधारित आहे. सध्या सर्वत्र राधे माँ आणि त्यांचा मुलगा हरजिंदर सिंह याच्याबद्दल चर्चा रंगत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.