राधिका आणि अनंत अंबानीच्या संगीत कार्यक्रमाची रंगीत तालिम सुरु, दाखवली जाणार दोघांची लव्ह स्टोरी
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. दोघांचा विवाह मुंबईतच जिओ सेंटरमध्ये होणार आहे. या विवाह सोहळ्याच्या आधी संगीत सेरमनीसाठी रंगीत तालीम सुरु झाली आहे. अंबानी कुटुंब अनंतच्या लग्नात कोणतीही कसर सोडत नाहीयेत.
अंबानी कुटुंब आपल्या दुसऱ्या मुलाच्या लग्नात कोणतीही कसर सोडत नाहीयेत. अनंत अंबानी यांच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबाकडून जय्यत तयारी सुरु आहे. अंबानी कुटुंबात पुन्हा एकदा सेलिब्रेशन सुरू होणार आहेत. नीता आणि मुकेश अंबानी यांनी आपल्या धाकटा मुलाच्या लग्नासाठी मोठी तयारी केली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न भारतात पार पडणार आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत आणि राधिकाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. 12 जुलै रोजी शुभ विवाह सोहळा, 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद कार्यक्रम आणि 14 जुलै रोजी स्वागत समारंभ होणार आहे.
संगीत समारंभ
अंबानी कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरू केली असून कुटुंबातील सदस्यांनी संगीताची तालीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत-राधिकाच्या म्युझिकल परफॉर्मन्ससाठी दोन वेगवेगळ्या बॅच तयार करण्यात आल्या आहेत. या डान्स परफॉर्मन्समध्ये एक बॅच अनंतच्या मित्रांची असेल, तर दुसरी बॅच राधिकाच्या मैत्रिणींची असेल.
मे महिन्याच्या शेवटी युरोपमध्ये दुसरा प्री-वेडिंग फंक्शन साजरा करण्यात आला होता. अनंत आणि राधिकाची सुंदर प्रेमकहाणी संगीत सोहळ्यात सादर होणार आहे. या दोघांच्या प्रेमकथेची झलकही या परफॉर्मन्समध्ये पाहायला मिळणार आहे. हे दोघे कधी, कुठे आणि कसे भेटले आणि त्यांचे प्रेम कसे फुलले हे यातून सांगितले जाणार आहे.
या सोहळ्यात बॉलिवूडमधील गाण्यांपासून ते राधिका मर्चंटच्या आवडता गायक कॅटी पेरी, ब्रिटनी स्पीयर्स आणि रिहाना यांची गाणी वाजवली जाणार आहेत. या फंक्शनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीही परफॉर्म करणार असल्याचं बोललं जात आहे.
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी 2 जुलै रोजी अंबानी कुटुंब वंचित लोकांसाठी सामूहिक विवाहाचे आयोजन करत आहे. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, पालघर येथे दुपारी साडेचार वाजल्यापासून हा कार्यक्रम होणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलैला राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.