Radhika – Anant : अनंत यांच्यापेक्षा मोठी आहे अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंट?
अनंत आणि राधिका लवकरच अडकणार विवाहबंधनात ; दोघांमध्ये मध्ये इतक्या वर्षांचं अंतर... अंबानी कुटुंबाची होणारी सून मुलापेक्षा मोठी? मोठं सत्य समोर..
Radhika Anant Ambani Age : देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबाना यांचं कुटुंब कायम चर्चेत असतं. नुकताच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचे पूत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा मोठ्या थाटात साखपुडा झाला. लवकरच अनंत आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) विवाहबंधनात अडकणार आहेत. अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हाजेरी देखील लावली. आज देखील अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. मिळालेल्या माहितीनुसार २०२३ मध्ये अनंत आणि राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. आता अनंत आणि राधिका यांच्या वयाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.
राधिका मर्चंट अनंत अंबानी यांच्यापेक्षा एक वर्ष मोठी आहे. राधिका यांच्या जन्म गुजरात याठिकाणी १८ डिसेंबर १९९४ साली झाला. तर अनंत अंबानी यांचा जन्म १० एप्रिल १९९५ साली झाला. दोघांमध्ये एका वर्षांचं अंतर आहे. राधिका वयाने अनंत यांच्यापेक्षा एक वर्षाने मोठी आहे. अनंत आणि राधिका दोघे लहानपणापासून खास मित्र आहेत.
राधिका मर्चंट देशातील औषधांची कंपनी एनकोर हेल्थकेयर (Encore Healthcare) चे सीईओ आणि अब्जाधीश उद्योजक विरेन मर्चंट (Encore Healthcare Viren Merchant) यांची एकुलती एक मुलगी आहे. राधिका यांच्या आईचं नाव शैला मर्चंट (Shaila Merchant) आहे. राधिका एक उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे. राधिकाने तब्बल ८ वर्ष भरतनाट्यम नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.
राधिकाने परदेशातून पॉलिटिकल आणि इकोनॉमिक्स या विषयांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर फॅमिली बिझनेस सांभाळत आहे. राधिका एनकोर हेल्थकेयरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सामिल आहे. राधिकाच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर राधिका यांच्याकडे जवळपास १० कोटी रुपयांची संपत्ती आहे. राधिकाच्या वडिलांकडे जवळपास ७५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. राधिकाचे वडील विरेन मर्चेंट देखील भारतातील प्रसिद्ध उद्योजक आहेत.
राधिका आणि अनंत याच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान आता अनेक चाहते दोघांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहे. पण मर्चंट आणि अंबानी कुटुंबाकडून लग्नाच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या सर्वत्र राधिका आणि अनंत यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.