Ambani Family | राधिका मर्चंटची अंबानी कुटुंबात कशी झाली एन्ट्री, खास आहे ‘लव्हस्टोरी’, दोघांचा Unseen फोटो समोर

Ambani Family | अंबानी कुटुंबात होतंय नव्या सुनेच्या स्वागताची तयारी... अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची दमदार सुरुवात, जामनगर येथे पोहोचले अनेक सेलिब्रिटी... फार कमी लोकांना माहिती आहे राधिका मर्चंट - अनंत अंबानी यंची 'लव्हस्टोरी'

Ambani Family | राधिका मर्चंटची अंबानी कुटुंबात कशी झाली एन्ट्री, खास आहे 'लव्हस्टोरी', दोघांचा Unseen फोटो समोर
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 10:37 AM

मुंबई | 1 मार्च 2024 : प्रसिद्ध उद्योजक एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चेंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचं लग्न अंबानी कुटुंबातील लहान मुलगा अनंत अंबानी यंच्यासोबत होणार आहे. 12 जुलै रोजी राधिका – अनंत यांचं लग्न होणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राधिका – अनंत यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीच्या चर्चा सुरु आहे. प्री-वेडिंग सेरेमनीसाठी अनेक सेलिब्रिटी देखील जामनगर याठिकाणी पोहोचले आहेत. सर्वांना माहिती आहे की, राधिका अंबानी कुटुंबाची होणारी सून आहे. पण फार कमी लोकांना राधिका – अनंत यांच्या लव्हस्टोरीबद्दल माहिती नाही. तर आज राधिका – अनंत यांच्यामध्ये प्रेम कसं बहरलं जाणून घेऊ.

राधिका – अनंत यांची मैत्री

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात राधिका – अनंत यांचा साखरपुडा झाला आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून राधिका – अनंत एकत्र आहेत. असं असताना देखील राधिक कधीच प्रसिद्धी झोतात आल्या नाहीत.

रिपोर्टनुसार, राधिका – अनंत लहानपणापासून खास मित्र आहेत. पण दोघांच्या रिलेशनशिपबद्दल कोणतीच गोष्ट समोर आली नाही. अनंत अंबानी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परदेशात उच्च शिक्षणासाठी गेले. त्यानंतर राधिका देखील अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेले. दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.

हे सुद्धा वाचा

राधिका – अनंत यांचा पहिला फोटो

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा पहिला फोटो 2018 मध्ये समोर आला. फोटोमध्ये दोघांनी ऑलिव्ह ग्रीन रंगाचा ड्रेस घातल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये दोघे एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा पहिला फोटो समोर आल्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगण्याची सुरुवात झाली.

अंबानी कुटुंबात राधिकाची एन्ट्री

राधिका यांच्या ‘अरंगेत्रम सेरेमनी’ मध्ये मुकेश अंबानी आणि राधिका अंबानी देखील उपस्थित होते. तेव्हा त्यांनी राधिका आणि अनंत यांच्या नात्याबद्दल सांगितलं. शिवाय डिसेंबर 2022 मध्ये दोघांचा रोका देखील पार पडला. आता राधिक – अनंत लवकरच लग्नबंधनात अडकतील.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत आणि राधिका यांची प्री-वेडिंग सेरेमनी 1 मार्च ते 3 मार्च या कालावधीत गुजरातमधील जामनगर येथे होणार आहे. प्री-वेडिंग सेरेमनीसाठी अनेक सेलिब्रिटी जामनगर येथे पोहोचले आहेत. 12 जुलै रोजी मुंबईत दोघेही लग्न करणार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.