शाहरुखची ‘ही’ अभिनेत्री दुसऱ्यांदा बनणार आई? 4 महिन्यांपूर्वीच केलं दुसरं लग्न

शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटात काम केलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान भारतातही प्रसिद्ध आहे. या चित्रपटातील तिची शाहरुखसोबतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात माहिराने थाटामाटात दुसऱ्यांदा निकाह केला होता.

शाहरुखची 'ही' अभिनेत्री दुसऱ्यांदा बनणार आई? 4 महिन्यांपूर्वीच केलं दुसरं लग्न
Mahira KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 8:46 AM

मुंबई : 12 फेब्रुवारी 2024 | अभिनेता शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री माहिरा खानने बॉलिवूडमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली. या चित्रपटातील तिचं अभिनय आणि शाहरुखसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. माहिरा तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तिने दुसऱ्यांदा निकाह केला. माहिराने सलीम करीमशी लग्न केलं. हे लग्न केवळ पाकिस्तानातच नाही तर भारतातही चर्चेत होतं. आता काही रिपोर्ट्सनुसार माहिरा दुसऱ्यांदा आई बनणार असल्याचं कळतंय. सोशल मीडियावर यासंबंधीची एक पोस्ट व्हायरल होत आहे. गरोदर असल्यामुळे माहिराने दोन प्रोजेक्ट्सना नकार दिसल्याचंही समजतंय.

माहिराची ड्यु-डेट ऑगस्ट-सप्टेंबर 2024 असल्याचं म्हटलं जात आहे. या कारणामुळे तिने आता कामातून ब्रेक घेतला आहे. बाळाच्या जन्मानंतर ती चित्रपटात परतणार आहे. माहिरा आणि सलीमने आतापर्यंत प्रेग्नंसीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र लवकरच हे दोघं चाहत्यांना गोड बातमी सांगणार असल्याचं कळतंय. माहिराचा पती सलीम हा फिल्म इंडस्ट्रीतला नाही. तो एक बिझनेसमन असून गेल्या पाच वर्षांपासून माहिराला डेट करत होता. सलीम ‘सिम्पैसा’ नावाच्या एका प्रसिद्ध स्टार्ट अप कंपनीचा सीईओ आहे. ही कंपनी 15 पेक्षा जास्त देशांमध्ये विविध क्षेत्रातील मर्चंट्सना सुविधा प्राप्त करून देते. याशिवाय सलीम प्रोफेशनल डीजेसुद्धा आहे.

हे सुद्धा वाचा

सलीम आणि माहिराची पहिली भेट एका इव्हेंटमध्ये झाली होती. 2020 मध्ये माहिराने माध्यमांसमोर तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. एका मुलाखतीत तिने सलीमला डेट करत असल्याचं म्हटलं होतं. “हमसफरमधील एक ओळ मला खूप आवडते. जिथे अशर खिरदला म्हणतो, माझ्या कोणत्या चांगल्या कर्माच्या बदल्यात तू मला भेटलीस माहीत नाही. हाच विचार मला सलीमबद्दल येतो. मी माझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असेन. म्हणूनच अल्लाहने त्याला माझ्याकडे पाठवलं”, असं ती म्हणाली होती.

माहिराचं पहिलं लग्न 2007 मध्ये पाकिस्तानी अभिनेता आणि दिग्दर्शक अली अस्करीसोबत झालं होतं. 2009 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माच्या सहा वर्षांतच माहिरा आणि अली अस्करी विभक्त झाले. आईच्या दुसऱ्या निकाहमध्ये मुलगा अझलान स्वत: तिला मंचापर्यंत घेऊन जाताना दिसला होता.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.