Raghav Chadha यांच्या खांद्यावर डोकं ठेवून परिणीतीने घेतला क्रिकेटचा आनंद, फोटो व्हायरल
अखेर परिणीती चोप्रा हिच्या हातातील आंगठी चाहत्यांना दिसलीच... क्रिकेटचा आनंद घेतना राघव चड्ढा यांच्या खांद्यावर डोकं ठेवताना दिसली अभिनेत्री... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या नात्याच्या चर्चांनी सध्या तुफान जोर धरला आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण अद्यापही दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना पुन्हा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. नुकताच दोघांना मोहाली याठिकाणी ‘पंजाब किंग्स’ आणि ‘मुंबई इंडियन्स’ यांचा आयपीएल सामना पाहताना स्पॉट करण्यात आलं. सध्या राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा याचे स्टेडियममधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. कारण फोटोमध्ये अभिनेत्रीच्या बोटात चाहत्यांना आंगठी दिसली.
परिणीती आणि राघव चढ्ढा यांचे स्टेडियममधील एकत्र अनेक फोटो समोर आले आहेत. काही फोटोंमध्ये दोघेही मॅच एन्जॉय करताना दिसत आहेत, तर काही फोटोंमध्ये परीने राघव यांच्या खांद्यावर डोके ठेवलं आहे. यापैकी एका फोटोमध्ये चाहत्यांना परिणीतीची अंगठी देखील दिसली. म्हणून चाहते परिणीतीच्या बोटात असणारी अंगठी साखरपुड्याची असल्याची चर्चांनी जोर धरला आहे.
सध्या सोशल मीडियावर दोघांच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. फोटोवर कमेंट करत एक युजर म्हणाला, ‘परीची अंगठी दिसत आहे..’ दुसरा युजर कमेंट करत म्हणाला, ‘त्यांचा साखरपुडा लंडनमध्ये झाला आहे…’ हॉटेलबाहेर दोघांना एकत्र पाहिल्यानंतर परिणीती – राघव चड्ढा यांच्या नात्याची चर्चा रंगली. पण अद्याप दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं आहे. शिवाय दोघांच्या कुटुंबाने देखील कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांची ओळख महाविद्यालयापासून आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आता दोघांच्या साखरपुड्याची चर्चा रंगत आहे.
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी परिणीती बँकिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रयत्न करत होती. वयाच्या १७ व्या वर्षी परिणीती शिक्षणासाठी लंडनमध्ये गेली होती. पण बँकिंग क्षेत्रात करियर न करता परिणीतीने अभिनयात स्वतःची ओळख निर्माण केली.
परिणीती हिने अनेक सिनेमांमध्ये भूमिका बजावत चाहत्यांच्या मनात घर केलं. परिणीताने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लेडीज vs रिक्की’ सिनेमातून करियरला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. चाहते कायम परिणीताच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.