Parineeti Raghav | ‘मुलगा ठीक आहे?’; साखरपुड्यातील परिणीती चोप्राचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

परिणीती आणि राघव येत्या ऑक्टोबर महिन्यात लग्न करणार असल्याचं कळतंय. सध्या दोघांचे कुटुंबीय या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातून अनेक नामांकित व्यक्ती या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

Parineeti Raghav | 'मुलगा ठीक आहे?'; साखरपुड्यातील परिणीती चोप्राचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 2:31 PM

नवी दिल्ली : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 13 मे रोजी या दोघांचा साखरपुडा पार पडला. दिल्लीतील कपुरथळा इथल्या निवासस्थानी परिणीती आणि राघव यांनी साखरपुडा केला. या साखरपुड्याच्या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळतेय. परिणीती आणि राघवच्या एका खास व्हिडीओने आता नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव दोघं स्टेजवर उभे आहेत. यावेळी परिणीतीच्या हातात माइक आहे आणि ती म्हणते, “सर्वजण मला म्हणायचे की, यार एक मुलगा तरी शोध.” यानंतर ती राघवकडे इशारा करत पुढे म्हणते, “हुण ठीक है?” (हा ठीक आहे का?) हे ऐकताच चोप्रा कुटुंबीय एकत्र मोठ्याने ‘हाँ’ असं म्हणतात. यावरून चोप्रा कुटुंबीयांनी मंजुरी दिली आहे, असं परिणीती म्हणते. त्यानंतर ती राघवच्या कुटुंबीयांकडे वळते आणि त्यांना विचारते, “आता चड्ढा तुम्हीसुद्धा मंजूर करता का?” सर्वजण आनंदाने एकच कल्ला करतात. चड्ढा कुटुंबीय मोठ्याने आवाज करताच परिणीती तिच्या कुटुंबीयांना आणखी मोठ्याने ओरडण्यास सांगते.

हे सुद्धा वाचा

परिणीती आणि राघव यांच्यातील प्रेम आणि दोघांमधील केमिस्ट्री फक्त कुटुंबीयांनाच नाही तर चाहत्यांनाही खूप आवडत आहे. या दोघांच्या साखरपुड्यात गायक मिका सिंगने त्याच्या एकापेक्षा एक दमदार गाण्यांनी मैफल जमवली होती. स्टेजवर उपस्थित असलेले परिणीती आणि राघव यांनीसुद्धा त्यावर ठेका धरला होता.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

साखरपुड्यानंतर परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राघव यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. साखरपुड्यासाठी दोघांचा अत्यंत साधा आणि तितकाच आकर्षक अंदाज पहायला मिळाला. परिणीती आणि राघव यांनी साखरपुड्यासाठी मोती रंगाच्या पोशाखाला पसंती दिली. मनीष मल्होत्राने परिणीतीचे कपडे डिझाइन केले होते. तर राघव यांनी परिधान केलेला अचकन हा त्यांच्या काकांनीच डिझाइन केला होता. ‘ज्या प्रत्येक गोष्टीसाठी मी प्रार्थना केली होती.. मी हो म्हणाले’, असं कॅप्शन देत परिणीतीने साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

परिणीती आणि राघव येत्या ऑक्टोबर महिन्यात लग्न करणार असल्याचं कळतंय. सध्या दोघांचे कुटुंबीय या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातून अनेक नामांकित व्यक्ती या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. हे दोघं दिल्ली किंवा राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.