Parineeti Raghav Engagement: परिणीती हिच्या स्वागतासाठी सजला खासदार राघव चड्ढा यांचा सरकारी बंगला, पाहा व्हिडीओ
नव्या नवरीच्या स्वागतासाठी फुलांनी सजला खासदार राघव चड्ढा यांचा सरकारी बंगला... रॉयल साखरपुड्याचा व्हायरल होणारा व्हिडीओ नक्की पाहा...
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. एवढंच नाही अनेकदा राघव आणि परिणीती यांच्या नात्याबद्दल देखील विचारण्यात आलं. तेव्हा दोघांनी देखील नात्याबद्दल सत्य सांगणं टाळलं. अखेर शनिवारी साखरपुडा झाल्यानंतर दोघांनी फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. राघव चड्ढा साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत म्हणाले, ‘ती होकार देईल यासाठी मी प्रार्थना केली… ‘ सध्या सर्वत्र राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची चर्चा सुरु आहे. दोघांनी फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी देखील परिणीती आणि राघव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
महत्त्वाचं म्हणजे नव्या नवरीच्या स्वागतासाठी खासदार राघव चड्ढा यांचा सरकारी बंगला फुलांनी सजवण्यात आला होता. शिवाय फुलांची रांगोळी देखील काढण्यात आली होती. सध्या राघव चड्ढा यांच्या बंगल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओ पाहुन अभिनेत्रीचे चाहते देखील आनंदी झाले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर परिणीती हिच्या भव्य घराचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये अभिनेत्रीच्या घरात साखरपुड्याची तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे. परिणीती हिचं घर मुंबई येथील वांद्रे याठिकाणी आहे. अभिनेत्रीच्या सजवलेल्या घराचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी परिणीतीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Parineeti Chopra Engagement)
#WATCH | Delhi | Lighting and floral decoration at the Government residence of AAP MP Raghav Chadha ahead of his engagement with actress Parineeti Chopra that will reportedly be held tomorrow. pic.twitter.com/fvkqJVXd5s
— ANI (@ANI) May 12, 2023
परिणीतीला हॉटेलबाहेर खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding)
मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती – राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं असलं तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरलं. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे.