Parineeti Chopra साखरपुड्यानंतर विमानतळावर स्पॉट; अभिनेत्रीच्या बॅगची किंमत जाणून व्हाल थक्क
खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत साखरपुडा झाल्यानंतर परिणीती चोप्रा विमानतळावर स्पॉट.. अभिनेत्रीच्या हतात असलेल्या बॅगची किंमत हैराण करणारी...
मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांचा १३ मे रोजी मोठ्या थाटात साखरपुडा संपन्न झाला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, साखरपुड्याने दोघांना एकत्र मुंबई आणि दिल्ली विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी परिणीती हिने लाल रंगाचा साधा ड्रेस घातला होता. पण परिणीती हिच्या हतात असलेल्या बॅगेने सर्वांचं लक्ष वेधलं. परिणीतीची ही बॅग प्रचंड महागडी आहे. अभिनेत्रीच्या हतात असलेली बॅग दिसायला साधी असली तरी, बॅग खरेदी करण्यासाठी अभिनेत्रीला मोठी रक्कम मोजावी लागली आहे . सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती चोप्रा आणि तिच्या महागड्या बॅगची चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीच्या बॅगची किंमत जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल…
अभिनेत्री परिणीती चोप्रा कायम तिच्या साधा आणि आकर्षक लूकमुळे चर्चेत असते. साध्या लूकमध्ये देखील अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसतं. साखरपुड्यानंतर जेव्हा अभिनेत्रीला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं, तेव्हा देखील अभिनेत्री साध्या लूकमध्ये दिसली. पण अभिनेत्रीच्या हतात असलेली बॅग सध्या चर्चेचा विषय आहे. अभिनेत्रीच्या हतात असलेल्या बॅगची किंमत जवळपास १.३३ लाख रुपये आहे.
परिणीती चोप्रा हिची साखरपुड्याची अंगठी देखील प्रचंड महागडी… परिणीती चोप्राने शनिवारी दिल्लीत आप नेते राघव चड्ढा यांच्यासोबत साखरपुडा केला. साखरपुडा संपन्न झाल्यानंतर, अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या एंगेजमेंट रिंगचे अनेक फोटो शेअर केले. परिणीतीने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. पण सर्वांचं लक्ष फक्त अभिनेत्रीच्या अंगठीकडे होतं. राघव चड्ढा यांनी होणाऱ्या पत्नीच्या बोतात प्रचंड महाग अंगठी घातली आहे.
परिणीती हिच्या साखरपुड्याच्या अंगठीची किंमत जवळपास ८० ते ९० लाख रुपये आहे. इतक्या पैशांमध्ये एक घर तर नक्की खरेदी करता येईल. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या अंगठीची आणि साखरपुड्याच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
परिणीती चोप्रा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री, महानायक अमिताभ बच्चन(Amitabh bachchan), अनुपम खेर (Anupam Kher) आणि बोमन ईराणी यांच्यासोबत ‘उंचाई’ सिनेमात दिसली होती. आता परिणीती दिग्दर्शत इम्तियाज अली दिग्दर्शित ‘चमकिला’ सिनेमात अभिनेता दिलजीत दोसांझ याच्यासोबत दिसणार आहे.