मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिणीती आणि राघव एकमेकांना डेट करत आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण परिणीती आणि राघव यांनी कधीही सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केला नाही. शिवाय १३ मे रोजी साखरपुडा करणार असल्याचं देखील दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी गुलदस्त्यात ठेवलं. अखरे शनिवारी रात्री ९ च्या सुमारास दोघांनी साखरपुडा झाला असल्याचं जाहीर केलं. सध्या परिणीती आणि राघव यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. शिवाय परिणीती – राघव यांच्या कपड्यांबद्दल चर्चा रंगत असताना अभिनेत्रीच्या अंगठीची देखील किंमत समोर आली आहे.
परिणीती चोप्राने शनिवारी दिल्लीत आप नेते राघव चड्ढा यांच्यासोबत साखरपुडा केला. साखरपुडा संपन्न झाल्यानंतर, अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या एंगेजमेंट रिंगचे अनेक फोटो शेअर केले. परिणीतीने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. पण सर्वांचं लक्ष फक्त अभिनेत्रीच्या अंगठीकडे होतं. राघव चड्ढा यांनी होणाऱ्या पत्नीच्या बोतात प्रचंड महाग अंगठी घातली आहे.
परिणीती हिच्या साखरपुड्याच्या अंगठीची किंमत जवळपास ८० ते ९० लाख रुपये आहे. इतक्या पैशांमध्ये एक घर तर नक्की खरेदी करता येईल. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या अंगठीची आणि साखरपुड्याच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्री आणि खासदार राघव चड्ढा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
परिणीती चोप्रा हिने १३ मे रोजी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत साखपुडा केला आहे. सध्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राघव आणि परिणीती यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. पण दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी नात्याबद्दल मौन बाळगलं होतं. अखेर शनिवारी दिल्ली येथील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊस याठिकाणी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला. परिणीतीच्या स्वागतासाठी खासदार राघव यांचा सरकारी बंगला नव्या नवरीप्रमाणे सजवण्यात आला होता.