राहुल महाजन याची तिसऱ्या बायकोच्या आईसोबत डेट, नातं लग्नापर्यंत पोहोचलं पण…, काय घडलं?

Rahul Mahajan : तिसऱ्या पत्नीच्या आईसोबत लग्न करणार होता राहुल महाजन; नाही टिकलं कोणतंच नातं, आता चौथ्या लग्नाच्या तयारीत राहुल महाजन? तिसऱ्या पत्नीच्या आईमध्ये आणि राहुल महानज यांच्यामध्ये होतं 4 वर्षांचं अंतर..

राहुल महाजन याची तिसऱ्या बायकोच्या आईसोबत डेट, नातं लग्नापर्यंत पोहोचलं पण..., काय घडलं?
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 11:40 AM

Rahul Mahajan : गेल्या काही दिवसांपासून दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन चौथ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राहुल महाजन यांच्या चौथ्या लग्नाची चर्चा सुरु आहे. राहुल महाजन याने तीन लग्न केले. पण कोणतंच नातं जास्त काळ टिकलं नाही. राहुल याचे तीन घटस्फोट झाले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे, तिसऱ्या पत्नीच्या आईसोबत राहुल महाजन लग्नबंधनात अडकणार होता. तिसऱ्या पत्नीच्या आईने आणि राहुल महाजन यांनी एकत्र वेळ देखील व्यतीत केला. पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. याचा खुलासा खुद्द राहुल महाजन याने एका शोमध्ये केला होता. आता राहुल महाजन पुन्हा चौथ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र फक्त राहुल महाजन याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

राहुल महाजन याच्या तिसऱ्या पत्नीचं नाव नताल्या आहे. राहुल याने आपल्या आईसोबत लग्न करावं अशी नताल्या हिची इच्छा होती. नताल्या म्हणाली होती, ‘तेव्हा राहुल याला लग्न करायचं होतं आणि तो जोडीदाराच्या शोधात होता. मी माझ्या आईला राहुल याच्यासोबत सेट करण्याचा प्रयत्न केला…त्यांची भेट घालून दिली…’

तेव्हा नताल्या हिचं वाक्य पूर्ण करत राहुल म्हणाला, ‘नताल्या हिची आई तरुण आहे. आमच्या दोघांमध्ये फक्त 4 वर्षांचं अंतर आहे. म्हणून मी नताला हिच्या आईसोबत लग्न करावं अशी तिची इच्छा होती. कारण नताल्या आणि माझ्यात वयाचं अंतर फार आहे.’ पण नताल्या हिच्या आईसोबत राहुल महाजन याचं लग्न होवू शकलं नाही. कारण नताल्या हिच्यावर राहुल याचा जीव जडला होता..

हे सुद्धा वाचा

राहुल महाजय याचं तिसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. तिसरी पत्नी नताल्या हिच्यासोबत देखील राहुल याचा घटस्फोट झाला. नताल्या आधी राहुल महाजन यांचं पहिलं लग्न श्वेता सिंग आणि दुसरं लग्न डिंपी गांगूली हिच्यासोबत झालं होतं. फार कमी कालावधीत राहुल महाजन याचं तिन्ही पत्नींसोबत नातं तुटलं. श्वेता आणि डिंपीने राहुलवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता.

आता राहुल चौथं लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर राहुल महाजन याचा एका महिलेसोबत फोटो व्हायरल होत आहे. फोटो पाहिल्यानंतर राहुल महाजन याच्या चौथ्या लग्नाची चर्चा रंगली आहे. पण यावर राहुल याने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. राहुल कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.