Rahul Roy | ब्रेन स्ट्रोकनंतर राहुल रॉय यांची प्रकृती स्थिर, नानावटी रुग्णालयात उपचार सुरू!
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राहुल रॉय (Actor Rahul Roy) यांना कारगिलमध्ये शूटिंग सुरु असताना मेंदूघाताचा (brain stroke) झटका आल्याची माहिती समोर आली होता.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राहुल रॉय (Actor Rahul Roy) यांना कारगिलमध्ये शूटिंग सुरु असताना मेंदूघाताचा (brain stroke) झटका आल्याची माहिती समोर आली होती. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह द बॅटल ( LAC – Live the Battle) या चित्रपटाचे शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यान त्यांची तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. (Rahul roy brain stroke condition stable new) राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्यानंतर तातडीने कारगिल येथील सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना सैन्याच्या मदतीने श्रीनगर येथे हेलिकॉप्टर आणण्यात आले. त्यांच्यावर आता मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे. एलएसी- लिव्ह द बॅटल या चित्रपटामध्ये ‘बिग बॉस फेम’ निशांत मालकानी देखील झळकणार आहे. निशांत टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला की, ‘हे सर्व मंगळवारी घडले आम्ही सर्व सोमवारी रात्री झोपायला गेलो तेव्हा तो बरा होता. मला वाटतं की, त्याची तब्येत हवामानामुळे खराब झाली आहे. कारण कारगिलचे तापमान -15 डिग्री सेंटीग्रेड आहे, जिथे आम्ही शूट करीत होतो.’ तो पुढे म्हणाला की, ‘मंगळवारी राहुलची तब्येत ठीक नव्हती. आमच्या लक्षात आले होते की, ते संवाद योग्यरित्या बोलू शकत नव्हता. वाक्य पूर्ण करताना त्याला त्रास होत होता. संध्याकाळपर्यंत त्याची प्रकृती अधिक खालावली होती. तो इकडे तिकडे पहात होता.’ राहुल रॉय यांनी ‘आशिकी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टी पदार्पण केले होते. नव्वदीच्या दशकात या चित्रपटाने लोकप्रियतेचे नवे मापदंड रचले होते. सध्या राहुल रॉय कारगिलमध्ये LAC – Live the Battle या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. यामध्ये ते एका मेजरची व्यक्तिरेखा साकारत आहेत. नितीन कुमार गुप्ता LAC – Live the Battle या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. तर चित्रा वकील शर्मा आणि निवेदिता बसू या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. या चित्रपटामुळे राहुल रॉय लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. ‘आशिकी’ चित्रपटानंतर राहुल रॉय यांनी तब्बल ४७ चित्रपट साईन केले. मात्र, त्यानंतर राहुल रॉय हिंदी चित्रपटसृष्टीपासून दुरावले. मध्यंतरी ते छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. ते ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाचे विजेते ठरले होते. त्यानंतर ते पुन्हा लाईमलाईटपासून दूर गेले होते.
संबंधित बातम्या :
Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!
(Rahul roy brain stroke condition stable new)