Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुव वैद्य – दिशा परमार यांच्या लेकीची पहिली झलक, कोणा सारखी दिसते चिमुकली नव्या?

Rahul Vaidya and Disha Parmar : आलिया भट्ट - रणबीर कपूर यांच्यानंतर राहुव वैद्य - दिशा परमार यांनी जगाला पहिल्यांदा दाखवला लेकीचा चेहरा, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या लेकीची चर्चा...

राहुव वैद्य - दिशा परमार यांच्या लेकीची पहिली झलक, कोणा सारखी दिसते चिमुकली नव्या?
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 9:29 AM

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवतात. पण काही सेलिब्रिटी मात्र त्यांच्या चिमुकल्यांचा चेहरा संपूर्ण जगाला दाखवतात. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यानंतर अभिनेता राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांनी देखील लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आह. गेल्या वर्षी 20 सप्टेंबर रोजी दिशा आणि राहुल यांनी जगात लेकीचं स्वागत केलं. आता दोघांनी पहिल्यांचा लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. ‘बडे अच्छे लगते हैं’ फेम दिशा आणि ‘बिग बॉस 14’ फेम राहुल मुलीसोबत प्रचंड आनंदी दिसत आहेत. राहुल आणि दिशा यांना लेकीसोबत विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.

राहुल आणि दिशा यांना पाहिल्यानंतर पापाराझींची गर्दी जमली. तेव्हा राहुल आणि दिशा यांनी लेकीचा चेहरा दाखवला. पापाराझींनी व्हिडीओ पोस्ट करत विचारलं, ‘मुलगी कोणासारखी दिसते, वडील राहुल याच्यासारखी, की आई दिशा हिच्यासारखी?’ यावर चाहते देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राहुल आणि दिशा यांच्या लेकीची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते म्हणाले, ‘मुलगी हुबेहूब राहुल वैद्य याच्यासारखी दिसत आहे.’ दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘पूर्णपणे राहुल याच्यासारखी…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रचंड क्यूट दिसत आहे…’ राहुल – दिशा यांच्या लेकीवर चाहते देखील प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

लेकीच्या जन्मानंतर राहुल म्हणाला होता, ‘मी प्रचंड आनंदी आहे. खूप चांगल्या भावना आहेत. माझं पहिलं बाळ मुलगी असावी अशी माझी इच्छा होती. माझ्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे आता शब्द नाहीत…’ असं देखील अभिनेता म्हणाला होता.

सांगायचं झालं तर, रिॲलिटी शो ‘बिग बॉस 14’ मध्ये राहुल वैद्यने त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्याचवेळी त्याने लग्नासाठी प्रपोज देखील केला होता. त्यानंतर दिशा आणि राहुल यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले होते.

राहुल आणि दिशा दोघे देखील प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टार आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. राहुल आणि दिशा दोघे सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राहुल आणि दिशा स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.