टप्पूने ‘तारक मेहता..’ मालिका का सोडली? बबितासोबत अफेअरच्या चर्चांवर म्हणाला..

'या' कारणामुळे टप्पूने सोडली 'तारक मेहता..' मालिका; अखेर कारण आलं समोर

टप्पूने 'तारक मेहता..' मालिका का सोडली? बबितासोबत अफेअरच्या चर्चांवर म्हणाला..
Raj Anadkar and Munmun DuttaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 8:58 AM

मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेनं गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यात टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकत याने नुकताच मालिकेला रामराम केला. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने मालिकेचा निरोप घेत असल्याचं जाहीर केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजने मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं. यासोबतच त्याने बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली.

‘तारक मेहता..’ मालिकेतील टप्पू म्हणजेच राज आणि बबिता म्हणजेच मुनमुन हे एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा होती. राज आणि मुनमुन यांच्या वयात 9 वर्षांचं अंतर आहे. मालिकेच्या सेटवर या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले, असं म्हटलं जात होतं. अनेकदा या दोघांना सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा केलं गेलं. मात्र दोघांनी वारंवार या चर्चा फेटाळल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “काही लोक अजूनही त्याबद्दल बोलतात. मात्र मी नेहमीच माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केलंय. गॉसिप हा अभिनेत्याच्या आयुष्याचा एक भाग असतो. मी माझ्या कामावर अधिक लक्ष देतो आणि अशा चर्चांकडे दुर्लक्ष करतो. माझ्या कामावरून लक्ष विचलित होईल अशा चर्चांकडे मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. मला अशा चर्चांचा त्रास होत नाही”, असं तो म्हणाला.

यावेळी त्याने मालिका सोडण्यामागचं कारणसुद्धा सांगितलं. “हा माझा वैयक्तिक निर्णय होता. त्यात काहीच चुकीचं झालं नाही. एक अभिनेता म्हणून मला पुढे जायचं आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारून मला एक कलाकार म्हणून पुढे जायचं आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी टप्पूची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी मी कायम कृतज्ञ राहीन. मात्र यापुढे मला काहीतरी वेगळं साकारायचं आहे”, असं उत्तर राजने दिलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.