राज कुंद्रा यांना जामीन मंजूर, अभिनेत्री शिल्पा शेट्टीची इन्स्टाग्राम पोस्ट

मागील दोन महिन्यांपासून राज कुंद्रा तुरुंगात आहेत. अश्लील चित्रपत निर्मिती प्रकरणात राज कुंद्रा यांना 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. आज त्यांना जामीन मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीने एक पोस्ट केली आहे. शिल्पाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

राज कुंद्रा यांना जामीन मंजूर, अभिनेत्री शिल्पा शेट्टीची इन्स्टाग्राम पोस्ट
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 11:39 PM

मुंबई : चित्रपती निर्मिती प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अखेर मुंबईतील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मागील दोन महिन्यांपासून राज कुंद्रा तुरुंगात आहेत. अश्लील चित्रपत निर्मिती प्रकरणात राज कुंद्रा यांना 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. आज त्यांना जामीन मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीने एक पोस्ट केली आहे. शिल्पाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. (actress Shilpa Shetty’s Instagram post after Raj Kundra was granted bail)

शिल्पा शेट्टीनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. संध्याकाळच्या वेळेला शिल्पाने आपल्या इस्ट्रा स्टोरीमध्ये एक इंद्रधनुष्याचा फोटो शेअर केलाय. तसंच त्याला एक कॅप्शनही दिलं आहे. ‘इंद्रधनुचं अस्तित्व हे सांगण्यासाठीच आहे की, एका वादळानंतरही सुंदर गोष्टी होऊ शकतात’, असं शिल्पाने या फोटो सोबत लिहिलं आहे. शिल्पाचा हा मेसेज सध्या तिच्या आयुष्यात सुरु असलेल्या गोष्टींकडे बोट करतात. शिल्पासाठी आजचा दिवस नक्कीच खास आहे. कारण तिची बहीण शमिता शेट्टी आणि पती राज कुंद्रा घरी परत आले आहेत.

Shilpa shetty Insta Post

शिल्पा शेट्टीची इन्स्टाग्राम पोस्ट

राज कुंद्रा यांना अखेर जामीन

अश्लील चित्रपट प्रकरणात दीर्घकाळ तुरुंगात राहिलेले उद्योगपती राज कुंद्रा यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचे पती राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते एका अ‍ॅपद्वारे प्रदर्शित करणे यासारख्या गंभीर आरोपांमुळे अटक करण्यात आली होती. आता राज कुंद्राला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दोन महिन्यांपासून तुरुंगात

अश्लील चित्रपट बनवल्याच्या प्रकरणात राज कुंद्राला सोमवारी (19 जुलै) रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला आणि यावेळी त्यांना त्यच्या घरात सर्व्हर आणि 90 व्हिडीओ सापडले, जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले होते. राज याला याबाबत विचारले असता तो म्हणाले की, ते इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेंट तयार करतात, परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केले गेलेले नाही.

राज कुंद्रावर केवळ या अश्लील सामग्री बनवल्याच नाही, तर लोकांना काम देण्याच्या बहाण्याने लोकांकडून अश्लील व्हिडीओ बनवून घेतल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले होते.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले होते.

इतर बातम्या :

Defamation Case : कंगना रनौतने शिवसेनेवर साधला निशाणा, म्हटले- जावेद अख्तर यांनी पक्षाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला!

Sonu Sood | कोट्यवधींच्या अफरातफरीचा आरोप, आता सोनू सूद म्हणतोय ‘कर भला, तो भला, अंत भले का भला’!

Bollywood actress Shilpa Shetty’s Instagram post after Raj Kundra was granted bail

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.